सडे हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न

 सडे हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न



पोलीस प्रवाह न्यूज

मंडणगड-दि. २७- मंडणगड तालुक्यातील सडे येथील  जय हनुमान जनसेवा प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने उभे राहिलेल्या हनुमान मंदिराचे उद्घाटन व जीर्णोद्धार सोहळा मंडणगड खेड दापोली चे आमदार  योगेश रामदास कदम  यांच्या हस्ते दिनांक  २० मे रोजी होणार होते, पण आजारी असल्याने आमदार या कार्यक्रमाला उपस्थित शकले नाहीत. त्यामुळे  व तेच उद्घाटन २० मे रोजी  जेष्ठ समाजसेवक नथुराम सोनगरे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सडे गावचे सुपुत्र डा़ँ. दत्ता जाधव, मा‌. पोलीस उपनिरीक्षक सहदेव म्हसकर, सुभाष टाकळे, मंडणगड शिवसेना तालुका प्रमुख  प्रतापजी घोसाळकर, युवासेना जिल्हा प्रमुख चेतन सातोपे, ईरफान भाई बुरोडकरझळ, दिपक मालुसरे, संतोष पार्टे, बैकर गुरुजी, सडे गावच्या सरपंच हर्षदा भुवड, पोलीस पाटील शिवाजी बदे, माजी सरपंच कविता जगताप, विश्राम जाधव आदि मान्यवर उपस्थित होते. 

      यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस सुभेदार अशोक दगडु चव्हाण यांना कर्तव्यदक्षता सन्मान देण्यात आला. राजेंद्र जाधव यांना सद्धावना पुरस्कार  तसेच  सुरेश जाधव यांना जीवनगौरव सन्मान  तसेच हरीचंद्र जाधव यांना जय हनुमान सन्मान देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अर्जृन पवार होते, तर कार्याध्यक्ष  रविंद्र जाधव होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन दिनेश जाधव  तसेच महेंद्र माने यांनी केले. मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

     या कार्यक्रमप्रसंगी हनुमान मुर्तीला अभिषेक, कळस पुजन  व सत्यनारायणाची महापुजा अशा विविध धार्मिक विधी करण्यात आल्या. तसेत विवीध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आले .सदर सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी कृष्णा चव्हाण, कृष्णा जाधव तसेच समस्त सडे जाधववाडी,पवारवाडी, आणि मानेवाडी या तिनही वाडीतील ग्रामस्थांचा  मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या