जिल्हाधिकारी म्हसे यांच्या संकल्पनेतील स्वच्छता अभियानास माणगांवात सकारात्मक प्रतिसाद
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव नगरपंचायत हद्दीतील सर्व शासकीय-निम शासकीय यंत्रणाचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवीसंस्था, विविध व्यावसायिकांच्या संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकार सेवा संघ व नागरिकांनी शहर स्वच्छतेसाठी शुक्रवार २६ मे २०२३ रोजी सकाळी ठिक ०६ वाजता माणगांव पोलीस परेड मैदानावर एकत्र येत जिल्हा स्वच्छता अभियानांतर्गत आपली उपस्थिती नोंदवून माणगांव प्रांताधिकारी उमेश बिरारी, नगर पंचायत मुख्याधिकारी संतोष माळी, तहसिलदार विकास गारूडकर यांचे मुख्य उपस्थितीत कचेरी रोड परिसर ते वाकडाई देवी मंदिर परिसरामध्ये मोठ्या जोशपूर्णतेने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
नगर पंचायत प्रशासना मार्फत मोहीमेत सहभागी झालेल्या सर्वांसाठी हातमोजे, मास्क तसेच हात धुण्या साठी सॅनीटायझर,पाणी तसेच अल्पोपहार पाणी बाॅटल्स
व्यवस्था करण्यात आली होती. मोहिमेंतर्गत कचेरीरोड साबळे विद्यालया जवळील रेल्वे पुलाखाली इशरत-प्लाझा इमारती जवळील कोपर्यात अतिशय गलिच्छ निर्लज पणे नेहमीच कचरा फेकण्यात येतो. याठिकाणी दुर्गंधीयुक्त कचरा घाण होती, विशेष म्हणजे मोहीमेत सहभागी झालेल्या महसुल विभागातील महिला कर्मचाऱ्यांकडून मोठ्या मेहनतीने येथे चकाचक सफाई करुन रांगोळ्या काढुन परिसर सुशोभित केला. तसेच माणगांव मधिल सैनिक विश्रामगृह परिसर व्यापारी संघटनेच्या सदस्यांनी मोठे कष्टप्रद साफ केला.
या मोहीमेत श्री सदस्यांनी स्वयंस्फूर्तपणे सहभागी होत त्यांनीही परिसरातील आव्हानात्मक ठिकाणी आम्ही स्वच्छतेच काम करतो असे प्रांत उमेश बिरारी यांना सांगत, स्वच्छता मोहीमेत उत्साह भरला. या स्वच्छता अभियानात कचेरीरोड परिसरातील विद्रूपीकरण बॅनर्स फलक अनधिकृत टपऱ्या देखील हटविण्यात आल्या आहेत. तसेच यापुढील स्वच्छतेचा दूसरा टप्प्यात माणगांव हायवेवरही स्वच्छता करण्यात येणार आहे. यावेळेस आलेले अनुभव व आणखी मोठ्या प्रमाणात संपूर्ण माणगांव स्वच्छ सुंदर राखण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे मोहीमेत मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी उमेश बिरारी यांनी म्हटले आहे.
नगर पंचायत हद्दीमध्ये कचेरी रोड (महेंद्र ज्वेलर्स ते वाकडाई देवी मंदिर) येथे सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानाचा भाग म्हणून अदल्या दिवशी कचेरीरोड वरील दोन अतिक्रमणे हटविण्यात आली, तसेच दुकान मालक फुटपाथवर ठेवत असलेले नामफलक, वस्तू जप्त करण्यात आल्या. स्वच्छ करण्यात आलेल्या रस्त्याची लांबी १. ८ किमी असून उचलण्यात आलेला एकूण कचरा २५ टन अंदाजे कचरा संकलनासाठी मशिनरींचा एकूण वापर-०७ ट्रॅक्टर,०१ टेम्पोट्रक, ०१ पिकअप, ०३ घंटागाडी, फावडे, खराटे, झाडू, कोयते, पाटी इ. या मोहिमेत एकूण १७७ शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते.





0 टिप्पण्या