स्वदेस फाउंडेशनच्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दररोज होते १८०० किलो वॅट सौर ऊर्जा तयार
लोणेरे-दि. २९ - रॉनी व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाउंडेशनच्या वतीने रायगड व नाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचे प्रकल्प सुरू आहेत,स्वदेस फाउंडेशनच्या वतीने रायगड जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई दूर होण्यासाठी गाव विकास समितीच्या सहकार्यांमधून माणगाव, तळा, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन व सुधागड तालुक्यामध्ये प्रकल्प सुरू आहेत,स्वदेस फाऊंडेशन ने गाव विकास समितीला पाणी प्रकल्पाचे वीज बिलावरिल भार कमी करणे साठी सर्व पाणी प्रकल्प सौर ऊर्जा आधारित तयार केले आहेत, आत्तापर्यंत ३५० पाणी योजना या सौरऊर्जांवर आधारित चालू आहेत व या प्रकल्पासाठी अविरतपणे ग्रामस्थांना त्यांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी नळाद्वारे मिळत आहे.शेतीसाठी पाणी या प्रकल्पाअंतर्गत वीजबिल आणि इंधन खर्च कमी करण्यासाठी आत्तापर्यंत १४२ सौर पंप शेतकऱ्यांना वैयक्तिक व सामूहिक शेतीसाठी देण्यात आले आहेत
तसेच २९अंगणवाडी व ६३ प्राथमिक शाळा व ७ माध्यमिक शाळा यासाठी सौर प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. याचा प्रत्यक्ष फायदा शाळेमधील विद्यार्थ्यांना होत आहे. स्वदेस फाउंडेशनच्या वतीने स्वप्नातील गाव हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम सुरू आहे व या कार्यक्रमांतर्गत स्वप्नातील गावांमध्ये घरोघरी सौरऊर्जा दिवे व गावामध्ये सौरऊर्जा पथ दिवे बसविण्यात आले आहेत, आतापर्यंत ६४६८ घरांमध्ये सौरऊर्जा दिवे देण्यात आले आहेत तसेच १०६ गावांमध्ये १४४५ सौरऊर्जा पथदिवे लावण्यात आली आहेत. तसेच नैसर्गिक आपत्तीच्यावेळी ८० गावांमध्ये १४५ घरघुती सौरऊर्जा दिवे देण्यात आली आहेत. स्वदेस फाउंडेशनच्या विविध सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दररोज १८०० किलो वॅट सौर ऊर्जा तयार होत आहे व प्रत्येक दिवसाला १४५८ किलोग्रॅम कार्बन उत्सर्जन हवेमध्ये कमी होत आहे व दरवर्षी ३०६ मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन वाचत आहे तसेच या सर्व गावांमध्ये वीज बिलामध्ये बचत होत आहे, सौर ऊर्जा प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती गाव विकास समिती करत असल्यामुळे सर्व सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे कार्यरत आहेत.
स्वप्नातील गावांमधील अपारंपरिक उर्जा वापर वाढत आले. त्याच बरोबर १० लाखाच्या वर झाडे स्वदेस फाउंडेशन काम करत असलेल्या या गावांमध्ये लावल्यामुळे भविष्यामध्ये ही गावे जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी मदत करतील अशी माहिती स्वदेस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी दिली आहे.



0 टिप्पण्या