माणगांव वनक्षेत्रपालांची अवैध सागवान वृक्षतोड आणि लाकूड माफियांच्या वाहतुकीवर करडी नजर...??

 माणगांव वनक्षेत्रपालांची अवैध सागवान वृक्षतोड आणि लाकूड माफियांच्या वाहतुकीवर करडी नजर...??

पाणोसेकोंड येथून सुमारे १२ हजारांची सागवान लाकडे जप्त.

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव : दि. ४ - माणगांव तालुक्यातील साळवे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या पाणोसे कोंड गावच्या हद्दीत अवैध वृक्ष तोड (सागवान वृक्ष)होत असल्याची व साठा करून वाहतूक होत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून माणगांव तालुका पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष पत्रकार प्रमोद जाधव यांना १ मे रोजी मिळाली. तात्काळ कोणत्याही प्रकारचा विलंब न करता सदर माहिती पत्रकार प्रमोद जाधव यांनी वनरक्षक अक्षय मोरे व वनरक्षक वैशाली भोर यांना कळविली .

     प्रत्यक्षदर्शी पाणोसे कोंड या गावी माणगांव वनखात्याचे अधिकारी पोहचले असता त्या ठिकाणी वन खात्याचा वाहतुकीचा पास व लाकडावर शिक्के असलेले सागवान तसेच बिन शिक्क्याची सागवान लाकडे देखील १ मे रोजी पाणोसे कोंड येथील बाळकृष्ण महादेव पांचाळ यांच्या गुरांच्या गोठयाजवळ आढळून आली.ही लाकडे अवैधरित्या वाहतूक करून आणली असल्याचे माणगांव वनविभागाकडून पत्रकारांना सांगण्यात आले आहे.या सागवान लकडांमध्ये ३१ नग साग,१.१७८ घनमीटर अंदाजे रक्कम ११,५४४ इतकी आहे.या संदर्भात माणगांव वनविभागाकडून पाणोसे कोंड येथील बाळकृष्ण महादेव पांचाळ यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    सदर कारवाई माणगांव चे वनक्षेत्रपाल अनिरुद्ध ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी एस सुभेदार, उतेखोल वनरक्षक अक्षय मोरे,माणगांव वनरक्षक वैशाली भोर यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.यावरून असे दृष्टीक्षेपात येत आहे की,माणगांव तालुक्यात लाकुडमाफियांकडून होत असलेल्या सागवान व इतर नगदी  लाकडांच्या तस्करीवर व अवैध वाहतूकिवर माणगांव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची करडी नजर आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या