पोलीस प्रवाह कडून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान.
पोलीस प्रवाह संघर्षगाथा विशेषांकाचे प्रकाशन.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव : दि. २६ - पोलीस प्रवाह वर्धापन दिनानिमित्त माणगांव पोलीस ठाणे येथे दिनांक २६ मे रोजी माणगांव पोलीस ठाणे येथे माणगांव तालुका पत्रकार सेवा संघ व पोलीस प्रवाह संस्थापक नवनाथ कापले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्याहस्ते संघर्षगाथा ह्या विशेषांकाचे प्रकाशन व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्मान करण्यात आला.
या विशेष सत्कारामध्ये माणगांव तालुक्यातील शिरवली तर्फे गोवेले गावचे सुपुत्र दत्ताराम पांडुरंग शिंदे यांनी अतिशय खडतर जीवनप्रवासातून मार्ग काढत मुंबई आणि माणगांव तालुक्यात आरोग्य शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात करत गौरवपूर्ण कार्य करत असल्याने आदर्श समाजसेवा पुरस्कार देण्यात आला.
तसेच माणगांव शहरातील वयाच्या १८ व्या वर्षापासून उद्योग व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असलेले नंदकुमार जमनादास मेथा यांचा उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच अल्पावधीतच माणगांव पोलीस ठाणे येथे कार्यरत होऊन अनेक गुन्ह्यांची उकल केलेले माणगांव चे पोलीस उपनिरीक्षक कीर्तिकुमार गायकवाड यांना कर्तबगार पोलीस अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन पोलीस बनण्याची जिद्द उराशी बाळगून पोलीस शिपाई म्हणून पोलीस दलात दाखल होऊन माणगांव मधील अनेक गुन्ह्याचे गूढ उकळणारे माणगांव पोलीस ठाण्याचे गोपनीय शाखेत काम करणारे कर्मचारी शामसुंदर शिंदे यांना आदर्श पोलीस कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
पोलीस प्रवाह व माणगांव तालुका पत्रकार सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास.समाजसेवक दत्ताराम शिंदे यांचे कुटुंबिय, विद्युत परिवेक्षक संजय गांधी दहिवली ग्रामपंचायत सरपंच लाखाडे,कुमशेत सरपंच सचिन कदम,पो सई अस्मिता पाटील, पोसई सूर्यकांत भोजकर, स पो नि लहांगे,पो शि रामनाथ डोईफोडे, जेष्ठ पत्रकार रविंद्र कुवेसकर, पोलीस प्रवाह वृतसंपादक परेश शिंदे ,पत्रकार सुनील राजभर, वैभव सत्वे, निरंजन कळस, राम भोस्तेकर, नचिकेत म्हापसेकर, प्रमोद जाधव यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे व दोन्ही टीम चे माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी तोंडभरून कौतुक केले.







0 टिप्पण्या