माणगांव नगर पंचायत उपनगराध्यक्ष पदी भाजपचे राजेश मेहता

 माणगांव नगर पंचायत उपनगराध्यक्ष पदी भाजपचे राजेश मेहता 

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. १७- रायगड जिल्ह्यात नामांकित समजल्या जाणाऱ्या माणगांव नगर पंचायत उपनगराध्यक्ष पदी भाजपचे राजेश मेहता यांची बुधवार दि. १७ मे रोजी निवड करण्यात आली. ही निवड माणगांव नगर पंचायतच्या प्रमुख दालनात पार पडली. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी उमेश बिरारी यांनी काम पाहिले तर नगर पंचायत मुख्याधिकारी संतोष माळी देखील उपस्थित होते.

माणगांव नगर पंचायत २०२२ मध्ये झालेल्या निवडणूकित माणगांव विकास आघाडी व राष्ट्रवादी अशी चुरस झाली होती. यामध्ये शिवसेना ८ व भाजप १ असे एकूण ९ नगरसेवक तर राष्ट्रवादी काँग्रस, शेकाप  असे एकूण ८ नगरसेवक निवडून येऊन नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीची सत्ता जाऊन शिवसेनेची सत्ता आली. ज्ञानदेव पोवार यांनी शिवसेनेत प्रवेश करून ते नगराध्यक्ष स्थानी विराजमान झाले. व उपनगराध्यक्ष पदी सचिन बोंबले यांची निवड करण्यात आली होती. दि. १७ मे रोजी झालेल्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत माणगांव विकास आघाडीकडून भाजपचे राजेश मेहता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हर्षदा सोंडकर असे दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. निवडणुकी अंती राजेश मेहता यांना ९ तर हर्षदा सोंडकर यांना ८ मते मिळाली. 

या निवडणुकिमध्ये नवनियुक्त करण्यात आलेले राजेश मेहता यांच्या निवडीमुळे  त्यांच्या कुटुंब व हितचिंतक व मित्रपरिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून वाजतगाजत माणगांव बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली.  उपनगराध्य राजेश मेहता यांच्या भावी कार्यकालातून माणगांवमधील असंख्य नागरिकांच्या अनेक समस्यांचे निवारण होईल अशी संपूर्ण माणगांवकरांना अपेक्षा आहे. त्याच्यावर सर्व सामाजिक स्तरातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख ऍड. महेंद्र मानकर, नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या