विवाहित महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवून फोटो व्हायरल करण्याची धमकी

 विवाहित महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवून फोटो व्हायरल करण्याची धमकी

माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 


पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. १३- माणगांव तालुक्यात एका विवाहित महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवून फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्याची घटना घडली असून माणगांव पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तरपणे असे की, दि. १ फेब्रुवारी २०२२ ते दि. ३ मार्च २०२३ दरम्यान आरोपी सुनील धाडवे रा. इंदापूर, ता. माणगांव याच्या राहत्या घरी व माणगांव येथील मेघमल्हार लॉजवर पीडित महिलेस वेळोवेळी व ठिकठिकाणी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून पीडित महिलेचे काढलेले नग्न फोटो तिच्या मैत्रीणीच्या व्हाट्सएपवर पाठवून इतरत्र पाठविण्याची धमकी दिली. या गुन्ह्याची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. र. नं. १४४/२०२३ भा. दं. वि. सं. क. ३७६ (२) (एन), ३०६, माहिती  तंत्रज्ञान सुधारणा अधिनियम २००८ चे कलम ६७ (ए) प्रमाणे करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील करीत आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या