पहिली राष्ट्रीय कुडो स्पर्धा पुणे येथे संपन्न

 पहिली राष्ट्रीय कुडो स्पर्धा पुणे येथे संपन्न

पोलीस प्रवाह न्यूज

पुणे- दि. ११- कुडो इंटरनॅशनल फेडरेशन इंडिया द्वारा ५९ वा कुडो ट्रैनिंग कॅम्प व भारत सरकार मान्यता प्राप्त पहिली कुडो राष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धा पुणे येथील नेताजी सुभाष चंद्र बोस मिलिटरी स्कुल, फुलगाव येथे दि. १ मे ते ७ मे रोजी  कुडो इंटरनॅशनल फेडरेशन इंडिया अध्यक्ष मेहुल वोरा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत भारतातून आंध्रप्रदेश, अरुणाचलप्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, मणिपूर, ओडिसा, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश, वेस्ट बंगाल, पुडुचेरी, अंदमान निकोबार, दिल्ली, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र राज्यातून स्पर्धंसाठी निवड झालेले ५६६ स्पर्धक व १५० कोच सहभागी झाले होते.

पहिल्या राष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा चषक गुजरात राज्य  विस्पी खराडी, द्वितीय क्रमांक राजस्थान राज्य, राज मीनारिया व तृतीय क्रमांक - महाराष्ट्र राज्य, जस्मिन मकवाना यांच्या संघाने जिंकला.

मेहुल वोरा यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच कुडो राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन पुणे येथे करण्यासाठी पुणे जिल्हा कुडो संघटनेला संधी दिल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष  अरविंद मोरे यांनी मेहुल वोरा यांचे आभार मानले तसेच स्पर्धेसाठी नेताजी सुभाष चंद्र बोस मिलिटरी स्कुल, फुलगाव, पुणे मार्फत देशाच्या विभिन्न राज्यातून सहभागी झालेल्या विद्यार्थी व कोच यांची चांगल्या पद्धतीने सोय केली त्याबद्दल संचालक दीपक पायगुडे, प्राचार्य अमर क्षीरसागर व स्टाफ यांचे देखील आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या