माणगांव पोलीस ठाणे येथे कर्करोगपूर्व तपासणी शिबिर

 माणगांव पोलीस ठाणे येथे कर्करोगपूर्व तपासणी शिबिर

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. -२५- पोलीस अहोरात्र काम करीत जनतेचे संरक्षण करत असतात. ऊन, वारा, पाऊस यांची तमान बाळगता सणासुदीला सुद्धा कुटूंबापासून लांब राहून पोलीस आपले कर्तव्य चोखपणे बजावीत असतात.  जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात टाटा मेमोरियल सेंटर व कर्करोग प्रतिबंध विभाग खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी कर्करोग पूर्व तपासणी शिबिर होत आहेत. दि. २४ एप्रिल रोजी माणगांव पोलीस ठाण्यातील पोलिस बंधू आणि भगिनींसाठी कर्करोगपूर्व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

रायगड जिल्ह्यात तसेच जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात तंबाखू विरोधी जनजागृती आणि कर्करोग पूर्व तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पो. नि. राजेंद्र पाटील नेतृत्वाखाली हे शिबिर संपन्न झाले. 

या शिबिरामध्ये तोंडाचा कर्करोग, महिलांसाठी स्तनाचा कर्करोग व गर्भाशय मुखाचा कर्करोग या तपासण्या करण्यात आल्या आहेत. या शिबिरात असे रुग्ण आढळल्यास त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि पुढील उपचार देखील मोफत करण्यात येणार असल्याचे उपस्थित डॉक्टरांनी सांगितले. यावेळी शिबिरात ५२ पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली तपासणी करून घेतली. सदर शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटर मुंबई, कर्करोग प्रतिबंध विभाग खोपोलीच्या प्रमुख डॉ प्रतिभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचे वैद्यकीय समाजसेवक स्नेहल डी. के., दिनेश मुसळे, प्रेमदीप गायकवाड आणि सर्व सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या