आ. भरत गोगावले यांच्याकडून दुरावस्था झालेल्या जोर-कड़ापुर ग्रामीण रस्त्याच्या कामाला सुरुवात
माणगांव-दि. २९- रायगड जिल्ह्यातील आणि माणगांव तालुक्यात अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागातील कुंभे ग्रामपंचायतीमधील मौजे जोर हे गाव आहे. सदर गावाला जोडणारा जोर-कड़ापुर ग्रामीण रस्ता नं. १०७ या रस्त्याचे १९९९ साली वैद्यानिक विकास महामंडळातून फंड वापरून तत्कालीन शिवसेना भाजप युतीमधील गृहमंत्री तथा पालकमंत्री कै. प्रभाकर मोरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. आता सदर रस्त्याला वीस वर्षांहून अधिकचा काळ उलटून गेल्यामुळे रस्ता वाहून गेला होता. गावकरी तसेच नागरिकांना, शाळकरी मुलांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. अपघातांचे प्रमाण देखील वाढत होते.
परंतु, स्थानिक महाड पोलादपूर माणगांवचे आमदार तथा शिवसेना विधिमंडळ पक्षप्रतोद आ. भरत गोगावले यांनी जोर गावातील नागरिकांना दिलेल्या शब्दाप्रमाणे कित्येक वर्ष निधी अभावी रखडलेल्या रस्त्याला त्यांनी जिल्हा वार्षिक योजना लेखाशिर्ष २५१५ आणि मुख्यमंत्री सड़क योजनेतून रस्त्याची संपूर्ण मंजूरी घेवून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. अंदाजे २ कि. मी. चा कारपेट डांबरीकरण रस्ता पूर्ण करुन दिला आहे. उर्वरित अंदाजे ३.५ कि.मी. पर्यंतचा मंजूर रस्ता पावसाळ्यापूर्वी पूर्ण करुन देण्याची हमी दिली आहे. या रस्त्याच्या विकासासाठी १९९९ पासून आजपर्यंत पाठपुरावा करणारे स्थानिक समाजसेवक बाळू सिताराम भद्रिके तसेच जोर ग्रामस्थांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि आमदार भरतशेठ गोगावले यांचे जाहिर आभार मानले आहेत.




0 टिप्पण्या