माणगांव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकापचा लाल बाबटा- तालुका चिटणीस रमेश मोरे

 माणगांव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकापचा लाल बाबटा- तालुका चिटणीस रमेश मोरे


पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. ७- माणगांव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या चार तालुक्यांची बाजार समिती असलेल्या माणगांव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकापचा लाल बावटा फडकला असल्याची माहिती शेकाप माणगांव तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी दिली आहे.

या समितीमध्ये एकूण १८ सदस्यांचा समावेश आहे. या १८ मध्ये शेकापचे १२ सदस्य बिनविरोध झाले आहेत. १८ सदस्यांमध्ये सोसायटीमधून ११ सदस्य निवडून द्यायचे असतात. त्यामध्ये सर्वसाधारण मतदार संघातून ७  सदस्य व २ विमुक्त भटक्या जाती, १ ओबीसी असे ११ सदस्य व हमाल माताडी १ असे मिळून १८ पैकी १२ सदस्य शेकापचे आहेत. तसेच ग्रामपंचायत मतदार संघातून ४ व व्यापारातून २ सदस्य निवडले जातात. 

बिनविरोध झालेल्या सदस्यांची नावे:-

१)नाझनीन अस्लम राऊत(महिला)

२)गौरी भाऊ पैर(महिला)

३)सुषमा लिलाधर रिकामे(वि. भ. ज.)

४)गिजे विनायक राऊत(ओ. बी. सी.)

५)रमेश पांडुरंग मोरे(सर्वसाधारण)

६)हसनमिया अलतीफ बंदरकर(सर्वसाधारण)

७)कौस्तुभ विद्याधर धामणकर(सर्वसाधारण)

८)नरेश लक्ष्मण दळवी(सर्वसाधारण)

९)दिलीप विनायक उतेकर(सर्वसाधारण)

१०)महेश गजानन सुर्वे(सर्वसाधारण)

११)अल्लाउद्दीन अमर सनगे(सर्वसाधारण)

१२)स्वप्निल सिताराम दसवते(हमाल माताडी) 

सदरची निवडणूक ही शेकाप सरचिटणीस आ. जयंतभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आर डी सी बँक संचालक अस्लम राऊत, तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार यशस्वी पार पडली असून यात शेकाप यश मिळाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकापचा लाल बावटा फडकवून शेकापने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या