रॉबरीचा बनाव माणगाव पोलीसांकडुन उघड
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. ७- माणगांवमध्ये झालेला रॉबरीचा गुन्हा माणगांव पोलीसांनी उघडकीस आणला आहे. यामध्ये फिर्यादी आरोपी असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, प्रथम प्रभाकर पारावे वय २१ वर्षे, धंदा नोकरी रा. चिंचवलीवाडी, पो. गोरेगाव, ता. माणगाव, जि. रायगड हा यशगौरव कार्पोरेशन, तळेगाव, ता. माणगाव यांचे राईस मिलचे पैसे कलेक्शन करणेकरीता म्हसळा येथील व्यापारी, दुकानदार यांचेकडे गेला असता त्यास दि. ३१ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ०५.३० वा. चे सुमारास मोर्बा घाटामध्ये त्यांचे ताब्यातील अँटिव्हा स्कुटरवर जात असताना त्याचे मागुन अचानक एक पांढरे रंगाची मारूती स्वीफट गाडी नंबर नसलेली यावरील चालकाने स्कुटीला ओव्हरटेक करून, स्कुटीला आडवी लावुन थांबविली व कारमधुन अनोळखी तीन लोक उतारले व त्याचे पाठीवर असलेली लाल व निळया रंगाची बॅग व त्यामध्ये असलेले ५,५७,३३९/- रोख रकमेसह जबरदस्तीने खेचुन चोरी करून पळुन गेले बाबत प्रथम प्रभाकर पारावे याने तक्रार दिली होती.
सदर गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्याने माणगाव पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी जावुन तपास सुरू केला होता. सदर गुन्हा घडल्यानंतर पोलीसांनी वेगवेगळया ठिकाणी सिसिटीव्ही व तांत्रिक तपास करीत असताना पोलीसांना सदर फिर्यादी प्रथम प्रभाकर पारावे याचेबाबत संशय निर्माण झाला होता. त्यामुळे त्यास विश्वासात घेवुन तपास केला असता सदर फिर्यादी प्रथम प्रभाकर पारावे वय २१ वर्षे, धंदा- नोकरी रा. चिंचवलीवाडी, पो. गोरेगाव, ता. माणगाव, जि. रायगड याने लालसेपाटी व गाडी खरेदी करण्याची असल्याने सदर गुन्हयाचा बनाव केलेबाबत सांगितले. सदर गुन्हयामध्ये चोरीस गेलेली रक्क्कम ५,५७,२९९ /- रू सदर फिर्यादी प्रथम प्रभाकर पारावे याचेकडुन हस्तगत करणेत आलेली आहे. सदर बाबत पुढील कार्यवाही माणगाव पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सतिष आस्वर, नितीन मोहीते, नवनाथ लहांगे, पो उप निरीक्षक अस्मिता पाटील, विक्रांत फडतरे, किर्तीकुमार गायकवाड, स. फौ. किशोर कुवेसकर, पो. हवा. किरण तुणतुणे, मिलींद खिरीट, पो. शि. रामनाथ डोईफोडे, शामसुंदर शिंदे, संतोष सगरे यांनी केली आहे.

.jpeg)



0 टिप्पण्या