माणगाव तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्षपदी संतोष करकरे
माणगांव-दि. ५- माणगांव तालुका ग्रामपंचायत कार्यकरणी सभा ग्रामपंचायत कार्यालय लोणेरे या ठिकाणी अध्यक्ष नरेश काळेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरवातीला सभेच्या अध्यक्ष स्थानी नरेश काळेकर यांची निवड करून सभेला सुरवात करण्यात आली. सर्व प्रथम सचिव आशिष वाघमारे यांनी मागिल प्रोसिडींग इतिवृत्त वाचून सर्वानुमते मंजूर करण्यात आले. नंतर अध्यक्षांच्या परवानगीने नवीन कार्यकरणी जाहीर करण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मांडण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष रमेश टेंबे, अध्यक्ष पदी संतोष करकरे , उपाध्यक्ष भगवान शिंदे, सचिव गणेश मोरे, खजिनदार रोहीत डबडे, सहसचिव अजय गोरीवले, संघटक शशिकांत श्रीवर्धनकर, चंद्रकांत चांदोरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नंतर नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना जिल्हा संघटक विजय जाधव यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जिल्हा संघटनेच्या वतीने शुभेच्छा देऊन आपल्या मार्गदर्शनपर भाषणांमध्ये सांगितले की, आपण सर्व नवनिर्वाचित कर्मचारी पदाधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी विश्वासात घेऊन सोडवाव्यात. तसेच विविध विषयांवर मार्गदर्शन करुन सर्व पदाधिकारी याचे स्वागत करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष करकरे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे आभार मानतो. माझ्या अध्यक्ष पदाच्या काळात मी प्रत्येक ग्रामपंचायत कर्मचारी यांना योग्य न्याय देशाचा प्रमाणिकपणे काम करेल असा शब्द संतोष करकरे यांनी यावेळी दिला.
यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना जिल्हा सदस्य विजय जाधव, रमेश टेंबे कार्याध्यक्ष, नरेश काळेकर, आशिष वाघमारे, काशिनाथ सुतार, रोहीत डबडे, शैलेश आईत, तानाजी भोसले, शशिकांत श्रीवर्धनकर, चंद्रकांत चांदोरकर, निलम चालके, कांचन सावंत, आनिता सुतार, भारती सुतार, नुतन शिंदे, महादेव पाष्टे, व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सुत्रसंचालन विजय जाधव यांनी केले. तर आभार नरेश काळेकर यांनी मानले. नवनिर्वाचित अध्यक्ष यांचे विविध स्थरावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.




0 टिप्पण्या