रायगड जिल्हा मासिक रुद्र मंडळातर्फे धर्म संस्कार शिबिर व पौरोहित्य प्रशिक्षण संपन्न

 रायगड जिल्हा मासिक रुद्र मंडळातर्फे  धर्म संस्कार शिबिर व पौरोहित्य प्रशिक्षण संपन्न



पोलीस प्रवाह न्यूज

रायगड-दि.२३- रायगड जिल्हा मासिक रुद्र मंडळातर्फे  धर्म संस्कार शिबिर व पौरोहित्य प्रशिक्षण पार पडले.  हे धर्मसंस्कार शिबिर व्हावे ही संकल्पना प्रथमता माहेश्वर मूर्ती रोशन स्वामी, राकेश स्वामी व संदीप स्वामी यांनी मासिक रुद्र मंडळात मांडली आणि धर्मासाठी आणि समाज हिताच्या कार्याला नेहमीच अग्रेसर राहणारे रायगड जिल्हा मासिक रुद्र मंडळ यांनी तात्काळ होकार दर्शवला. 

मीटिंग करता रायगड जिल्हा अध्यक्ष  अमित स्वामी,  माजी अध्यक्ष प्रकाश स्वामी, राकेश स्वामी, लक्ष्मण स्वामी,  रोशन स्वामी, महेश स्वामी, महादेव स्वामी,  मंदार स्वामी, शैलेश स्वामी आणि असे अनेक पुरोहित चर्चासत्र मीटिंग घेऊन या कार्यक्रमाची भव्य असे प्रथमता आखणी केली तेथील नियोजन केले. खालापूर येथील प्रसिद्ध उद्योगपती पंकज दळवी यांच्या फार्म हाऊसवर हे शिबिर घ्यावे हे निश्चित झाले.

जिल्ह्यातील तळागाळातील अनेक महेश्वर बांधव व अनेक लहान मुले या शिबिरात हजर होती.  जुन्या शिबिरांचा अनुभव लक्षात घेता अनेक उपस्थित लहान थोरांच्या मनात थोडी भीती जाणवत होती.  इथले नियम इथली शिस्त कशी असेल?  याबद्दल मुलांच्या मनात थोडी धाकधूक वाटत होती. चेहऱ्यावर तेच भाव स्पष्ट दिसत होते. मात्र काही काळातच या मुलांना चैतन्य वाटू लागले.  सकाळचं मुखेडच्या स्वामींचं योगासने व डान्स करून मुलांच्या मध्ये सकाळ सकाळ एक वेगळेच चैतन्य भरून गेले त्यानंतर प्राप्त कर्म उरकून  ईष्टलिंग पूजा सामूहिक रित्या पार पाडून नाश्ता चहा घेऊन मुले पुढील सत्र करता आवडीने बसत शिकवणाऱ्या शिक्षकांकडून हसत खेळत ज्ञानार्जन करून दुपारी श्लोक म्हणून प्रसादाचा भक्षण मोठ्या भक्तीमय वातावरणात केले.  दुपारी थोडी वामकुक्षी करून संध्याकाळच्या सत्रात मुलं आनंदाने सहभागी झाली. दिवसाचा दमलेला क्षण भाग दूर करण्याकरता सायंकाळी पुन्हा शिवपाठ हे माहेश्वर बांधव मोठ्या हौशीने सहभागी होऊन पुन्हा मेडिटेशन त्यांचं होत असे.  शिवपाठामुळे एकी निर्माण होते शरीराचा जो व्यायाम निर्माण होतो व त्यामूळे त्यांना बुद्धीस प्रचंड चालना मिळते.

सायंकाळच्या प्रसादास तर श्लोक म्हणण्याची स्पर्धा लागत. भोजन हे श्लोकाच्या ओळी कानावर पडून फक्त पोटाची तृप्ती न होता मेंदूची तृप्ती देखील तिथे होत होती. निशू स्वामी आणि सुरेश स्वामी इंदापूर यांच्या हाताला साक्षात अन्नपूर्णा प्रसन्न आहे, असे वेळोवेळी जाणवत असे कारण उत्तम प्रतीचे भोजन व्यवस्था या मंडळींनी पार पाडली.  

शिकवण्याकरता वेदमूर्ती तथा प्राग शास्त्री प्रतिक स्वामी यांनी  स्वताकडील ज्ञानगंगा च शिबिरार्थं विद्यार्थ्यांच्या समोर ओतली. उत्तम पुरोहित तथा भजन सम्राट मंदार स्वामी यांनी बदल्यात काळात जंगम कसा बदलला पाहिजे. व त्याचे आचरण असावे निलेश स्वामी,  महादेव स्वामी,  प्रल्हाद स्वामी, मारुती स्वामी, महेश स्वामी, गणेश स्वामी, यांनी विशेष योगदान दिले व सुरुवातीपासूनच अभ्यासात्मक विषय हाताळून चर्चा करूनच योग्य ते शिक्षण सर्व माहेश्वर बांधवांसाठी दिले. मंदार स्वामी यांनी शिबिरात आपल्या विशिष्ठ शैलीत हसत खेळत आपल्या ज्ञानाची भांडार सगळ्यांना ना खुली करून विद्यार्थ्यांना ज्ञानाची कवाड खुली केली. 

प्रकाश स्वामी यांनी सर्वांवर व्यवस्थित लक्ष ठेवून सर्व कृती सर्वांकडून व्यवस्थित करून घेतले. त्यांच्यामुळे शिबिरात  चैतन्याचे काम पार पाडले गेले नेहमीचच आहे.  शिवाय त्यांच्या हातचे वडापाव अनेकांच्या जिभेवर राहिले. सांगता सोहळ्यात सर्वांनी राज्याभिषेकास शंख घेऊन उपस्थित राहिले.सुरुवातीपासूनच ज्याच्यावर जी जबाबदारी दिली ती त्यांनी स्व-इच्छेने पार पाडली. शिबिराचे पत्रक वाटण्याचे कामकरत प्रणव स्वामी,निलेश स्वामी व सुहास स्वामी यांनी मोलाची कामगिरी बजावली.

 या शिबिरा करता उद्योगपती व हिंदू धर्माप्रणेते  पंकज  दळवी यांनी केलेल्या भव्य नियोजनाबद्दल बोलावे तितके कमीच आहे.  अतिशय मोठी जागा आणि स्वतंत्र घर अतिशय भव्य मोठी पाण्याची टाकी जेवणाची रूम विज या सर्व गोष्टींची कुठलीही तमा न बाळगता  निसंकोचपणे या वस्तू समाजाकरता वापरण्यासाठी खुल्या मनाने, दिल्या ना कुठली बंधने घातली,  ना कुठले नियम  मुलांना झोपायला नविन कोऱ्या गाद्या आणल्या. मुलं या प्रसन्न वातावरणात मोठ्या आनंदाने एका छत्राखाली इतके राहिले की कोणालाही त्यांना नियमाची आठवण करून द्यावीशी वाटली नाही.  आणि ही जाणीव न करता मुलांनी अतिशय शिस्तीत स्वतःच राहून या शिबिराचा येथेच लाभ उठवला. या शिबिरास जिल्यातील अनेक मान्यवर मंडळी यांनी हजेरी लावली जसे की, लक्ष्मण स्वामी, रामेश्वर स्वामी, घनश्याम स्वामी,  सुहास स्वामी,  रुपेश स्वामी, रमेश स्वामी अशा अनेक लोकांनी आपला सहभाग दर्शवला.  

रायगड जिल्हा मासिक पुरोहित रूद्र मंडळाने आयोजीत केलेल्या या भव्य शिबिराची सांगता प्रती अमावस्या च्या दिवशी अमावस्या शिवसाधनेने झाली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या