माणगाव तालुका पत्रकार सेवा संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद जाधव तर कार्याध्यक्षपदी परेश शिंदे यांची बिनविरोध निवड
माणगाव तालुका पत्रकार सेवा संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. २३- रायगड जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार रायगड भूषण अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव तालुका पत्रकार सेवा संघाची स्थापना मागील ३ वर्षांपूर्वी करण्यात आली. दि. २३ एप्रिल रोजी पत्रकार सेवा संघाच्या जनरल सभेत माणगाव तालुका पत्रकार सेवा संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार प्रमोद जाधव तर कार्याध्यक्ष पदी पत्रकार परेश शिंदे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
या सभेत माणगाव व रायगड जिल्ह्यातील समस्या व अडचणी सोडविण्यासाठी या स्वतंत्र पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली असल्याचे ज्येष्ठ पत्रकार रवींद्र कुवेसकर यांनी सांगितले. तसेच कार्यकारिणी मध्ये आलेले नवनियुक्त पदाधिकारी कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष या युवा पत्रकारांनी आपल्या धारधार लेखणीतून अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. ते सतत सामाजिक प्रश्नांवर आपल्या लेखणीतून भाष्य करीत असतात. कोविड जनजागृती, सामाजिक, आरोग्य विविध समस्या या पत्रकारानी लोकांसमोर मांडल्या आहेत. त्यांच्याकडून नेहमीच दर्जेदार लिखाण होत असल्याने संस्थापक अरुण पवार व सहकारी ज्येष्ठ सल्लागार यांनी संघाची नवीन कार्यकारिणी निवडली आहे.
'समस्या तुमची साथ आमची' हे ब्रीद वाक्य घेऊन या पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली आहे. उपाध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार व सल्लागार प्रमोद मोहिरे व सुनिल राजभर यांची नियुक्ती करण्यात आली. तर सेक्रेटरी वैभव सत्वे, खजिनदार सुनिल राजभर, सहखजिनदार निरंजन कळस, प्रसिद्धिप्रमुख राम भोस्तेकर तर जेष्ठ सल्लागार पदी रायगड भूषण रवींद्र कुवेस्कर, प्रमोद मोहिरे, मुकेश कडू, अनिल मोकाशी, उदय चव्हाण यांची तर कायदेविषयक सल्लागार पदी डॉ संजय सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी माणगाव तालुका पत्रकार सेवा संघाचे सदस्य नचिकेत म्हापसेकर, पांडुरंग माने, प्रतीक मोरे , किरण शिंदे यांची उपस्थिती होती.





0 टिप्पण्या