मुगवली फाट्यानजीक दुचाकी व टँकरमध्ये अपघात

 मुगवली फाट्यानजीक दुचाकी व टँकरमध्ये अपघात

दुचाकीस्वार गंभीर जखमी

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. ५- माणगांवमध्ये मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.त्यामध्ये माणगांव ते लोणेरे या टप्प्यात मागील दोन महिन्यांपासून अपघातांची संख्या वाढली आहे. अशाचप्रकारे दि. ५ एप्रिल रोजी दुपारी १:३० ते १:४५ च्या दरम्यान मुगवली फाट्यानजीक जावळी हायस्कूलकडे देण्यात आलेल्या सर्व्हिस रोडच्या सुरुवातीला मोटारसायकल व केमिकल कंटेनर यांच्यामध्ये भीषण अपघात घडला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार दि. ५ एप्रिल रोजी मुंबई बाजूकडुन आपल्या मूळ गावी आंबेत नजीक असणाऱ्या दाभोळ गावी जाणारा मोटारसायकलस्वार  स्वप्नील देवरे वय ३० वर्षे  हा ह्या मार्गे आपल्या ताब्यातील मोटारसायकल होंडा युनिकॉर्न क्रं एम एच ४८ सी पी ५४६३ ही घेऊन जात असताना महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारा केमिकल टँकर क्रं एम एच ०३ सी व्ही ०८४४ यांच्यामध्ये मुगवली फाटा सर्व्हिस रोड येथे आल्यानंतर सामोरा-समोर ठोकर होऊन भीषण अपघात घडला आहे. यामध्ये अपघातातील समोरील वाहन टँकर चालक पलायन करत असताना त्याला ढालघर फाटा येथे पकडण्यात आले आहे.

या अपघात प्रसंगी घटनास्थळी तळेगाव ते माणगांव प्रवास करणारे शिवसेनेच्या माणगांव तालुका महिला आघाडी प्रमुख अरुणा वाघमारे व त्यांचे पती गणेश वाघमारे तसेच जावळी हायस्कूल चे शिक्षक गिरी सर यांनी घटनास्थळी डोळ्यासमोर हा अपघात पाहिल्यानंतर प्रसंगावधान राखत तात्काळ माणगांव पोलिसांना व माणगांव वाहतूक पोलिसांना संपर्क साधला व जखमी मोटारसायकल चालक स्वप्नील देवरे याला पुढील उपचारासाठी माणगांव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या स्वप्नील देवरे याची प्रकृती स्थिर असली तरी त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. या अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस करीत आहेत.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या