सिध्दनेर्ली येथे लोकसहभागातून वैकुंठभूमि सुशोभीकरण
पोलीस प्रवाह न्यूज
कोल्हापूर : दि. २ -सह्याद्री देवराई प्रणित निसर्ग व पर्यावरण संघटनेच्या वतीने नदिकिनारा सिध्दनेर्ली येथील वैकुंठभूमि परीसरातील सात वृक्षांना आकर्षक पार कट्टे बांधकामाचा शुभारंभ संपन्न झाला. या वेळी तेथील वृक्षाची माहिती आपल्याला एका क्लिकवर मिळावी या साठी त्याला क्यूआर कोड बसवून परीसरात वृक्ष,निसर्ग व पर्यावरण संदर्भात स्लोगनचा वापर केला जाणार आहे.या उपक्रमामध्ये आपल्या घरातील मयत व्यक्तींचे स्मृतिप्रीत्यर्थ हे पार कट्टे बांधले मुळे त्यांचे स्मारकच तयार होवून त्यांच्या स्मृती जपल्या जावून वैकुंठभूमि परीसरातील सुशोभीकरण होणार आहे.या उपक्रमात सिद्धनेर्ली गावातील १)कै.रामचंद्र तुकाराम मेटील (आण्णा) यांचे स्मरणार्थ श्री युत.कृष्णात रामचंद्र मेटील २) कै.सदाशिव दत्तात्रय येवलुजे यांचे स्मरणार्थ श्री.संजय दत्तात्रय येवलुजे. ३)कै.रत्नाबाई गणपती पोवार यांचे स्मरणार्थ श्री.व्ही जी पोवार (सर) ४) कै.शांताबाई महिपती खोत यांचे स्मरणार्थ श्री.जग्गनाथ महिपती खोत ५)कै.हिराबाई रामचंद्र पाटील यांचे स्मरणार्थ श्री.दशरथ रामचंद्र पाटील (परबत) ६)कै.रामचंद्र बापू मेटील यांचे स्मरणार्थ श्री.दिपक रामचंद्र मेटील ७)कै.आनंदा राजाराम घराळ यांचे स्मरणार्थ श्री राजेंद्र आनंदा यांनी विशेष योगदान दिले.
या उपक्रमाचा शुभारंभ वैकुंठभूमि परीसर नदी-किनारा सिध्दनेर्ली येथे सरपंच दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते वटवृक्षाचे पूजनाने व शाहू साखर संचालक प्रा सुनील मगदूम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला. यावेळी तानाजी पोवार सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.तर निसर्ग व पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष मधुकर येवलुजे व सरपंच दत्तात्रय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कागल तालुका खरेदी विक्री संघाचे नुतन संचालक कृष्णात मेटील,महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष व्ही जी पोवार सर, वित्त व लेखाधिकारी उमेश मगदूम, वाय व्ही पाटील,,कृष्णात पाटील,जयवंत पोवार,तानाजी पाटील,मोहन लाड,जैनुद्दीन मोमीन,लक्ष्मण गुरव,पवन पोवार,दिपक मेटील,सुजीत खोत,तानाजी जालंधर पाटील यांच्या सह निसर्ग व पर्यावरण संघटनेचे सदस्य उपस्थित होते.यावेळी संघटनेच्या वतीने संदीप मगदूम सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.





0 टिप्पण्या