प्रांजल फाउंडेशन सिद्धनेर्ली प्रणित रक्तदान शिबीर
पोलीस प्रवाह न्यूज
सिद्धनेर्ली : दि. २ - १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन याचे औचित्य साधून मागील 6 वर्षांपासून सिद्धनेर्ली येथे प्रांजल फाउंडेशन, दि सिद्धनेर्ली को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी व दहावी 1993 चे वर्गमित्र यांच्यामार्फत *रक्तदान शिबिर* आयोजित केले जाते ते 01 मे 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय सिद्धनर्ली येथे उत्साहात पार पडले.
शिबिराचे उद्घाटन डे. सरपंच सौ. वर्षा विनायक आगळे यांच्या हस्ते व सरपंच श्री दत्तात्रय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सदर रक्तदाणासाठी सिद्धनर्ली व पंचकृषितील 111 पुरुष व 2 महिला रक्तदात्यांनी शिबिरामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले. रक्तदानसोबतच मनवेल बारदोस्कर लिंक वर्कर यांचे मार्फत मोफत रक्त लघवी तपासणी शिबिराचे सुद्धा आयोजन केले होते. निरोगी जीवन व आहार या याविषयी आरोग्य चाचणी व आहार मार्गदर्शन श्रीनिवास पोवार (व्हनूर ) यांनी केले. सर्व रक्तदात्यांना प्रांजल फाउंडेशन कडून पुस्तके वितरण करण्यात आली. तसेच डॉ.अशोक पवार सर यांनी स्वतःच्या बागेतील बीट रूट वितरण केले व श्री रणजीत श्रीकांत पाटील यांनी सर्व उपस्थित व Avengers यांना अल्पोप्रहारची व्यवस्था केली. रक्तदाणासाठी रक्त संक्रमण अधिकारी म्हणून डॉ प्रवीण पाटील यांनी सेवा दिली.
सदर रक्तदान शिबिरात मा. एम बी पाटील मा. सरपंच, श्री विक्रम पाटील चेअरमन सिदनेर्ली क्रिडीट सोसायटी, श्री एम पी गोनुगडे अध्यक्ष प्रांजल फॉउंडेशन दहावी 1993 बॅच चे सर्व वर्गमित्र, ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.




0 टिप्पण्या