निजामपूर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस चा कोणताही पदाधिकारी पक्ष सोडणार नाही- बाबूशेठ खानविलकर
महाड विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर (बाबूशेठ) खानविलकर यांची पत्रकार परिषदेतुन माहिती.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव : दि. १२ - माणगांव तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा निजामपूर विळे विभाग ,या विभागात मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांची पक्षांतर्गत नाराजी तर मागील काही दिवसांपासून निजामपूर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे पदाधिकारी पक्षांतर करणार अश्या चर्चा दबक्या आवाजात निजामपूर विभागात सुरू होत्या.मात्र ११ एप्रिल रोजी महाड पोलादपूर माणगांव चे राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष चंद्रशेखर(बाबूशेठ ) खानविलकर यांनी पत्रकार परिषद घेत सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे.
या पत्रकार परिषदेत माहीती देताना बाबूशेठ खानविलकर म्हणाले की, निजामपूर विभागात राष्ट्रवादी काँग्रेस ची ताकद वाढती आहे आणि विरोधकाना याची धास्ती वाटू लागल्यामुळे आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत अश्या वल्गना सुरू केल्या आहेत.सध्यातरी निजामपूर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही पदाधिकारी पक्षांतर करणार नाही असे ठणकावून सांगितले आहे.तसेच या पत्रकार परिषदेत महाड विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष प्रसाद (बंड्या) गुरव यांनी देखील विरोधकांना सज्जड शब्दात दम दिला आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस निजामपूर विभाग अध्यक्ष संदीप जाधव म्हणाले की,राष्ट्रवादी चा कोणीही पदाधिकारी पक्ष सोडून जाणार नाही.आमचा आमच्या पक्ष नेतृत्वावर विश्वास आहे आणि तो यापुढेही कायम राहील. आणि विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली निजामपूर विभागातील पक्ष संघटना अधिका-धिक बळकट होत आहे.
तसेच निजामपूर ग्रामपंचायत चे सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी दूरध्वनीवरून संवाद साधत सांगितले की, निजामपूर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस चा प्रत्येक पदाधिकारी हा खासदार सुनिल तटकरे यांना मानणारा कार्यकर्ता आहे .व मागील काही दिवसांपासून पक्षांतराच्या चाललेल्या चर्चा ह्या खोडसाळपणाच्या आहेत असे मत व्यक्त केले आहे.
निजामपूर येथे घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस महाड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष चंद्रशेखर (बाबूशेठ) खानविलकर,उपाध्यक्ष प्रसाद (बंड्या गुरव),निजामपूर विभाग अध्यक्ष संदिप जाधव,निजामपूर विभाग युवक अध्यक्ष महेश कोंडेकर,निजामपूर विळे विभाग महिला अध्यक्ष देविका पाबेकर,सचिव किरण पागार,माजी पंचायत समिती उपसभापती तुकाराम सुतार,शिरवली विभाग अध्यक्ष विठ्ठल सावंत, विळे विभाग अध्यक्ष गणेश सकपाळ, निजामपूर शहर अध्यक्ष महेश शिर्के,आदी उपस्थित होते.





0 टिप्पण्या