आ. महेंद्र थोरवे यांनी माफी न मागितल्यास राष्ट्रवादी पद्धतीने उत्तर देऊ- तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे

 आ. महेंद्र थोरवे यांनी माफी न मागितल्यास राष्ट्रवादी पद्धतीने उत्तर देऊ- तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे

राष्ट्रवादी काँग्रेस माणगांवने पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला जाहीर निषेध

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. ११- रायगड जिल्हा माजी पालकमंत्री तथा श्रीवर्धन विधानसभा आ. आदिती तटकरे यांच्याबद्दल आ. महेंद्र थोरवे यांनी केलेल्या त्या बेताल वक्तव्याबद्दल माफी न मागितल्यास त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पद्धतीने उत्तर दिले जाईल असे माणगांव शहरातील कुणबी भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस माणगांव तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे म्हणाले.

दि. ११ एप्रिल रोजी माणगांव शहरातील कुणबी भवन येथे सकाळी ११ वा. माणगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आ. महेंद्र थोरवेंनी केलेल्या पालकमंत्री पदावरून आ. आदिती तटकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात करिता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माणगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस  अध्यक्ष सुभाष केकाणे, महाड पोलादपूर माणगांव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष चंद्रशेखर(बाबूशेठ) खानविलकर, जेष्ठ नेते इकबाल धनसे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष संगिता बक्कम, मा. पं. स. सदस्य शैलेश भोनकर, महिला आघाडी उपाध्यक्ष श्रद्धा यादव, उपाध्यक्ष किशोरी हिरवे, निजामपूर विभाग महिला आघाडी अध्यक्ष देविका पाबेकर, माणगांव शहर अध्यक्ष नितीन वाढवळ, शहर प्रमुख रवींद्र मोरे, ग्रा. पं. उणेगाव सरपंच राजेंद्र शिर्के, सुमित काळे, युवक अध्यक्ष रुपेश तोडकर, राजेंद्र जाधव, स्वप्निल सकपाळ, तुळसा पवार, साहिल गायकवाड आदी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी मा. ता. रा. कॉ. अध्यक्ष सुभाष केकाणे म्हणाले की, आदिती तटकरे या पालकमंत्री असताना त्यांनी कोणावरही अन्याय केला नाही. महाविकास आघाडीचा धर्म पालत त्यांनी जिल्ह्यातील सर्वांना समान न्याय दिला. त्यांचं सरकार येऊनही मंत्रीपद न मिळाल्याने गद्दार आमदारांनी वैफल्यग्रस्त टिपणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही. आ. आदिती तटकरेंनी अनेक लोकोपयोगी विकासकामे केली आहेत. या प्रस्तावित सरकारे गेली दहा महिलेने महिलांना अपमानास्पद वागणूक देत टार्गेट करण्याच्या उद्देशाने आ. थोरवे यांनी वक्तव्य केले आहे.

 तसेच मा. ता. रा. कॉ. महिला अध्यक्षा संगीता बक्कम म्हणाल्या की, या सरकार मार्फत महिलांच्या बाबतीत सातत्याने अपमानास्पद वक्तव्य केले जात आहेत. आ. आदिती तटकरेंचे काम कौतुकास्पद आहे. चक्रीवादळ, कोरोना, पूर परिस्थितीत ही आ. आदिती तटकरेंनी उत्कृष्ट काम केले. एक महिला एवढं काम कस करू शकते, याची पोटदुखी आ. थोरवे यांना झाल्यामुळे त्यांनी बेताल वक्तव्य केले आहे. असे वक्तव्य करून त्यांनी स्वतःची योग्यता दाखवून दिली आहे. तसेच यावेळी महाड पोलादपूर विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर खानविलकर, जेष्ठ नेते इकबाल धनसे, शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनी सुद्धा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या