उद्या माणगाव श्री दत्ताची जत्रा
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दुग्ध-शर्करा योग..
माणगांव पोलिसांचा चोख बंदोबस्त
माणगांवची जत्रा दरवर्षीची पण दत्तमंदिर जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत..?
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. १३- माणगांव हे जिल्हयाचे भौगोलिक दृष्ट्या मध्यस्थान आहे. माणगांव नगरपंचायत हद्दीत जुने माणगांव, खांदाड, नाणोरे, उतेखोल, भादाव अशी अशी मूळ गावे येतात. मात्र पूर्वेकडे माणगांव शहराचा विस्तार वाढत चालला आहे. या विस्तारामध्ये माणगांवचे लोकनेते अशोकदादा साबळे म्हणायचे तसे माणगांवमध्ये आला तो माणगांव मधेच राहिला. अशा विविध समाजाचे विविध धर्माचे लोक माणगांव शहरात आज एकोप्याने वावरत एकत्र आहेत. शहरातील मोठा उत्सव म्हणजे एप्रिल महिन्यात महिन्यात येणारी श्री दत्ताची जत्रा ही महत्त्वाची मानली जाते. मात्र यावर्षी ज्या महामानवाने आपणास स्वातंत्रयासहित जगण्याचे मूलभूत अधिकार त्या त्यापेक्षाही महत्वाचे भारतीय संविधान देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (१४ एप्रिल) देखील यावर्षी माणगांव शहरात थाटा-माटाने साजरी होत आहे. त्यामुळे या वर्षी सामाजिक सलोखा जपणाऱ्या माणगांवकरांचा हा दुग्ध शर्करा योग असल्याचे देखील बोलले जात आहे.
त्याचप्रमाणे या वर्षी माणगावची दत्ता ची जत्रा यावर्षी उद्या दि. १४ एप्रिल रोजी होत आहे. यामुळे माणगावकर नागरिकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. यावेळी प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून माणगांव शहरातुन जाणारा मुंबई गोवा महामार्ग व बाजारपेठ एकच प्रदर्शनी भाग असल्यामुळे व जत्रा हायवेवर च भरत असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी माणगांव पोलिसांकडून भीमजयंती रॅली साठी दुपारी १:३० ते २ नंतरची परवानगी देण्यात आली आहे. तर माणगांवची जत्रा ही १४ एप्रिल रोजी सायंकाळी होणार आहे. यावेळी दोन्ही महोत्सवाच्या अनुषंगाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे माणगांव पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
माणगावची जत्रा म्हणजे तालुक्यातील सगळ्यात मोठी जत्रा समजली जाते. या माणगावच्या जत्रेत माणगाव नगरपंचायत हद्दीतील नाणोरे, उतेखोल, भादाव, खांदाड, जुने माणगाव या नागरिकांच्यासह गावच्या देवांच्या काठ्यांची जंगी मिरवणूक व आतषबाजी व रोषणाई देखील असते. ज्या ठिकाणी जत्रा भरते ते माणगाव शहरातील मध्यवर्ती मुंबई गोवा महार्गावर असलेले श्री दत्तमंदिर हे अनेक वर्षांपासून जिर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. यामूळे जत्रा कमिटी व दत्तमंदिर विश्वस्त कमिटी या मंदिराचा जीर्णोद्धार तरी करणार? असा सवाल माणगाव तालुकावासीय उपस्थित करत आहेत. मागील दीड ते दोन महिन्यांपासुन सर्वत्र जत्रा सुरू आहेत. या जत्रांमध्ये विविध प्रकारच्या व्यापाऱ्यांची म्हणजे, लहान मुलांची खेळणी, गृहउपयोगी वस्तू ते आकाशपाळणे, मिठाई अश्या अन्य प्रकारच्या दुकानांची रेलचेल असते.





0 टिप्पण्या