निजामपूर विभागात खा. सुनिल तटकरेंना धक्का बसणार❓
निजामपूर विभागातील दोन बडे नेते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार❓तालुक्यात चर्चेला उधाण
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव- दि. १० - माणगांव तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्वाचा विभाग म्हणून निजामपूर, विळे भागाड आहे. या भागात सर्वपक्षीय मतदार असून या भागाचा आ. शिवसेना पक्षाचा आहे. परंतु, या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व ही बलाढ्य आहे. या विभागात एक जि. प. सदस्य व प.स. सद्स्य शिवसेनेचे असले तरी राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून निजामपूर विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य वाढले आहे. त्यामध्ये निजामपूर सारखी शहरी असणारी ग्रामपंचायत व विभागातील अनेक ग्रामपंचायती ह्या राष्ट्रवादी काँग्रेस व बहुतांशी ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडी धर्म पाळत सत्ता अस्तित्वात आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून निजामपूर विभागामध्ये विविध राजकीय गलबते शिजत आहेत अशी चर्चा माणगांव तालुक्यामध्ये सुरू आहे. त्यामध्ये निजामपूर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन बलाढ्य नेते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन खा. सुनिल तटकरेंना धक्का देणार? असल्याची चर्चा निजामपूर विभागासह संपूर्ण तालुक्यात ऐकवयास मिळत आहे.
येत्या काही महिन्यांतच स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि त्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर होतील. मात्र मागील काही महिन्यांपूर्वी निजामपूर विभागात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला प्रतिथयश प्राप्त करून देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते पक्षांतराच्या वाटेवर आहेत अशी चिन्हे दिसून येत आहेत तर विभागातील त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याकडून सांगितले जात आहे की ,येत्या १५ दिवसांत पक्षप्रवेश देखील होऊ शकतो..! मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बलाढ्य पदाधिकाऱ्यांचे नक्की बिनसले तरी कुठे? त्यामुळे त्यांनी शिवसेना (शिंदे गट) किंवा भाजप कडे पक्षांतराचा मार्ग अवलंबला आहे. अशी चर्चा देखील माणगांव तालुका आणि निजामपूर विभागातील नाक्या-नाक्यावर सुरू आहे.
माणगांव तालुक्यात तर एकच एम आय डी सी आहे. ती म्हणजे विळे भागाड एम आय डी सी.आणि त्यातील रोजगार आणि इतर विषयक कार्यक्षम असलेली कंपनी म्हणजे पॉस्को महाराष्ट्र स्टील यामुळे तर कुठे राजकारण्यांचे घोडे अडले नाही नाही ना? अशा चर्चाना देखील उधाण आले आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे समजते आहे की,या पक्षांतरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन बलाढ्य नेते यांचा समावेश आहे. मात्र नक्की बिनसले कुठे हा एक चर्चेचा विषय बनला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निजामपूर विभागात फूट पडणार की खासदार सुनिल तटकरे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राखणार याकडे सर्व माणगांव तालुका वासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.




0 टिप्पण्या