शेणाळे ते कोंडमालुसरे रोड वाहतुकीसाठी सुरू

 शेणाळे ते कोंडमालुसरे रोड वाहतुकीसाठी सुरू

उपतालुका प्रमुख  प्रमोद कृष्णा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

पोलीस प्रवाह न्यूज

मंडणगड-दि. ९- रायगड आणि रत्नागिरी जिल्हा यांची सीमारेषा आंबेत पूल. महाड दापोली राजमार्ग मार्गे रायगडची हद्द कोंड मालुसरे (दंड) त्यानंतर विन्हेरे मार्गे तुळशी खिंड अशाप्रकारे हे दोन जिल्हे रायगड व रत्नागिरी हे मंडणगड तालुक्याच्या माध्यमातून जोडले गेले आहेत.

मात्र गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला शेणाळे -सडे-मार्गे रायगड जिल्ह्यातील गाव कोंडमालुसरे (दंड) हा दोन जिल्हयाना जोडणारा रस्ता प्रस्तावित होता. मात्र काम मार्गी लागत नव्हते. या कामाचा पाठपुरावा सडे गावचे सुपुत्र प्रमोद कृष्णा चव्हाण शिवसेना उपतालुका प्रमुख मुंबई विभाग यांनी आमदार योगेश रामदास कदम यांच्याकडे सतत पाठपुरावा करून हे काम मार्गी लावून घेतले आहे.

सडे गावचे सुपुत्र व शिवसेना मुंबई विभाग मंडणगड उपतालुका प्रमुख प्रमोद कृष्णा चव्हाण यांनी दोन जिल्हाना जोडणाऱ्या व विशेष करून ग्रामीण खेडोपाड्याना जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचा  आमदार योगेश कदम यांच्याकडून हे काम पूर्ण घेतल्याबद्दल मतदारसंघाचे आमदार योगेश कदम व सडे गावचे सुपुत्र व शिवसेनेचे मुंबई विभाग मंडणगड तालुका प्रमुख प्रमोद कृष्णा चव्हाण यांचे विभागातील नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या