माणगांव जवळील मोर्बा घाटात तरुणाला ५लाख ५७ हजाराला लुटले.
३ आरोपींचा पोबारा.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव १ एप्रिल - माणगांव तालुक्याचा विकास झपाट्याने होत असला तरी गुन्ह्यांच्या प्रमाणात देखील त्याचप्रमाणात वाढ होत आहे अशीच एक घटना ३१ मार्च च्या सायंकाळी पुणे दिघी हायवेवरील मौजे मोर्बा गावच्या हद्दीत घाटात घडली आहे.या घटनेत ३ अज्ञात चोरट्यांनी एका तरुणाला तब्बल ५ लाख ५७ हजाराला लुटले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की,घटनेतील फिर्यादी प्रथम प्रभाकर पारावे रा चिंचवली वाडी गोरेगाव व्यवसाय धनंजय राईस मिल तळेगाव येथे नोकरी हे मिल च्या रिकव्हरी ची रक्कम रुपये ५,५७,३४९ ही पांढऱ्या पिशवीमध्ये घेऊन येत असताना ३१ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास मोर्बा गावच्या हद्दीत म्हसळा ते तळेगाव रोडवर वळणावर आपल्या ताब्यातील ऍक्टिवा स्कुटी क्रं एम एच ०६ सी सी ७१३६ आल्यावेळी त्यांच्या मागून अचानक आलेल्या मारुती स्विफ्ट नंबर नसलेली गाडी या गाडीच्या चालकाने प्रथम पारावे यांना ओव्हरटेक करून प्रथम पारावे यांच्या स्कुटी समोर गाडी आडवी लावून फिर्यादी यांची गाडी थांबली असता,मारुती स्विफ्ट गाडीतील अंदाजे २५ ते ३० वयाच्या ३ चोरट्यांनी प्रथम पारावे यांच्या मागे लावलेली लाल व निळ्या रंगाची बॅग त्यातील रक्कम ५ लाख ५७ हजार ३४९ ही जबरदस्तीने खेचून घेऊन ३ चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला.
या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात कॉ गु रजि. नं ८०/२०२३ ,भा दं. वि. स कलम ३४१,३९२,३४ प्रमाणे करण्यात आली असून, ३ अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि सतिष आस्वर हे करीत आहेत.


.jpeg)


0 टिप्पण्या