आरोग्य निर्देशांकामध्ये रायगड जिल्हयाने पटकाविला ५ वा क्रमांक

  आरोग्य निर्देशांकामध्ये रायगड जिल्हयाने पटकाविला ५ वा क्रमांक


पोलीस प्रवाह न्यूज

अलिबाग, दि. ३१- राज्य आरोग्य संसाधन यंत्रणा केंद्र पुणे यांच्यामार्फत राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या आरोग्य संस्थांमध्ये विविध आरोग्य कार्यक्रम राबविले जातात. या कार्यक्रमाचे निर्देशांक दरमहा जाहीर केले जातात. यामध्ये माहे जानेवारी-२०२३ च्या अहवालानुसार आरोग्य निर्देशांक कामगिरीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक रायगड हे राज्यात पाचवा क्रमांक मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. 

 माता बाल आरोग्य व कुटुंब कल्याण, असंसर्गजन्य आजार, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, कायाकल्प, लक्ष्य, आरबीएसके, आरसीएच पोर्टल, लसीकरण, रुग्णसेवा, टेलिमेडिसिन, हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम, आरकेएस, बांधकाम विभाग, प्रशासन, वित्त, किशोरवयीन स्वास्थ्य, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, एकात्मिक साथरोग सर्वेक्षण इत्यादीमधील कामानुसार गुणांकन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमामध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या कामगिरीमुळे जिल्हा शल्यचिकित्सक रायगड यांची आरोग्य निर्देशांकातील कामगिरी उंचावलेली आहे.  यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या