कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संस्थेने आयोजित केलेली पाहिलं कुणबी उद्योजक व्यवसायिक परिषद
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. २८- राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे कुणबी राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष आणि कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक अशोक वालम यांच्या प्रेरणेने उद्योजक व्यावसायिक घेण्यात आली. या परिषदेला उद्योग मंत्री उदय सामंत हे अधिवेशन चालू असतानाही उपस्थित राहिले. बहुउद्देशीय संस्थेच्या पहिल्या परिषदेचे अध्यक्ष स्थान माजी आमदार दिगंबर विशे यांनी भूषविले. मान्यवरांनी सर्वप्रथम दीप प्रज्वलन आणि महा पुरुषांना हार घालून कार्यक्रमाची सुरवात केली. त्याच बरोबर संस्थेचा आधिकृत लोगो, संस्थेचे यू ट्यूब चॅनल, वेब साईट आणि फेसबुक पेज याचे अनावरण सन्माननीय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
समाजाला उद्देशून केलेल्या भाषणात समाजाच्या नांवाने स्थापन झालेली कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ही पहिलीच संस्था असल्याचे सांगितले. आपल्या भाषणात समाजभूषण लोकनेते कै. शामराव पेजे यानी त्यांना वयक्तिक केलेल्या सहकार्याची आणि त्यांच्या पारदर्शक राजकारणाची माहिती समाजाला दिली. कै. शामराव पेजे यांचे नांव सतत असावे यासाठी कोकणात उभारण्यात आलेल्या पहिल्या इंजिनियरिंग कॉलेजला त्यांचे नाव देण्यात येईल याची ग्वाही दिली. तसेच कै. शामराव पेज आर्थिक विकास महामंडळात एक जागा कुणबी समाजाला देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुखमंत्री रोजगार निर्मिती योजनेत ओबीसी वर्गाचा समाविष्ट करून त्या मार्फत समाजाला ग्रामीण व शहरी भागात उद्योग करण्यासाठी ५० लाख ते १ कोटी पर्यंत आर्थिक मदत देण्याचे कबूल केले असून, त्याला ग्रामीण भागात ३५% तर शहरी भागात २५% सबसिडी देण्यात येईल असे सांगितले. तसेच संस्थेने कधीही सांगावे तेव्हा मंत्रालयातील त्यांची संपूर्ण टीम कॅम्प करून मार्गदर्शन व प्रोजेक्ट रिपोर्ट बनविण्यास मदत करेल असे सांगितले.
संस्था जर ग्रामीण भागात कुठले प्रोजेक्ट राबवणार असल्यास शासनाच्या माध्यमातून आपण लागणारा फंड उपलब्ध करून देऊ असे सांगितले. तसेच कोकणात टुरिझमला फार महत्त्व असून जर कोणाला हॉटेल, बोटी, वॉटर स्पोर्टस् चा व्यवसाय करायचा असेल तर अशा व्यवसायासही ५० लाख ये १ कोटी चे आर्थिक सहाय्य देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. यामुळे समाजाला कोकणात व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक उभारी मिळणार असून तरुणांनी आणि व्यवसायिकांनी कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेत मोठ्या संखेने सहभागी होऊन समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे असे आवाहन त्यांनी केले.
तर सन्मानित संस्थापक अशोक वालम यांनी समाजाची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी सर्वांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. तसेच या दिमखदार परिषदेचे सर्व श्रेय त्यांनी संस्थेची कार्यकारिणी, जिल्हा संपर्क प्रमुख, सर्व संपर्क प्रमुख आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिषदेची शोभा वाढविणाऱ्या समाज बांधवांना दिले. त्याच बरोबर समाज जर आर्थिकदृष्टया सक्षम झाला तर आपण आपले राजकीय अस्तित्व निर्माण होण्यास वेळ लागणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
संस्थेचे अध्यक्ष प्रेमनाथ ठोंबरे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे KCCI संस्थेच्या संकल्पनेची सविस्तर माहिती उपस्थित बांधवांना दिली. संस्थेची पुढील वाटचाल, शासकीय बिनव्याजी कर्ज वाटप याची सविस्तर माहिती संस्थेचे सचिव ऍड. अजय पाटील यांनी उपस्थित बांधवांना दिली. या परिषदेस कुणबी राजकीय संघटन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. समाजाचे मुलुंड येथील वसतिगृह उभारण्यासाठी राज्य शासनाने ७ कोटी रुपयाचे त्वरित अर्थसहाय्य दिल्याने कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे अध्यक्ष भूषण बरे आणि संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने उदयजी सामंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कुणबी समाजाचे नागपूर येथून आलेले आशिष राऊन यांनी GST या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुनील आग्रे यांनी सुद्धा GST व सेल्स टॅक्स या विषयावर योग्य मार्गदर्शन केले.असिस्टंट फूड कमिशनर कुमारी प्रियांका अशोक विशे हिने फूड लायसन्स या बाबतची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. तसेच सेवानिवृत्त सेल्स टॅक्स ऑफिसर आणि संस्थेचे ठाणे जिल्हा प्रमुख अशोक विशे यांनी KCCI संस्थेची समाजाला असलेली गरज आणि समाजानी संस्थेत सहभाग घ्यावा या बाबतचे आवाहन उपस्थितांना केले.
परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर विशे काळाची गरज ओळखून कुणबी समाजाने या एकीच्याबळाने या स्तुत्य उपक्रमात सहभाग घ्यावा आणि समाजाची आर्थिक ताकद वाढवावी आणि समाजाचा आर्थिक विकास करावा असे आवाहन केले. समाजभूषण किसन बोंद्रे आणि अशोक विशे यांनी मान्यवरांना सन्मान चिन्ह,शाल, श्रीफळ आणि मानाचा दुपट्टा देऊन सर्वांचा सत्कार केला व यजमानपद स्वीकारून व्यवस्थापनाची भूमिका निभावली. सदर परिषदेचे सूत्रसंचालन मनोहर मडके आणि सुनील माळी या समजबंधवानी उत्कृष्टपणे निभावली. शेवटी संस्थेचे सहसचिव ऍड विनेश वालम यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व समाजबांधांचे आभार मानून परिषदेची सांगता केली.




0 टिप्पण्या