टाटा पॉवर हाऊस भिरा येथे घुसले दोन अतिरेकी

 टाटा पॉवर हाऊस भिरा येथे घुसले दोन अतिरेकी

माणगांव पोलिसांचा सापळा यशस्वी

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव- दि. २९- माणगाव तालुक्यात दिनांक २९ मार्च रोजी माणगांव पोलीस ठाणे हद्दीत टाटा पॉवर हाउस भिरा ता. माणगांव या ठिकाणाहुन माणगांव पोलीस ठाणे येथे फोन करुन सांगितले गेले  की, टाटा पॉवर हाउस भिरा या ठिकाणी दोन अतिरेकी घुसले आहेत. तरी सदर ठिकाणी माणगांव पोलीस टीम व आरसीपी जवान तात्काळ घटनास्थळी रवाना केले .व त्याठिकाणाहून दोन अतिरेक्यांना ताब्यात घेतले. नंतर असे समजले की, रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक मा. सोमनाथ घार्गे व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मर्मस्थळ टाटा पॉवर हाउस भिरा या ठिकाणी सुरक्षेच्या अनुषंगाने मॉकड्रिल प्रत्याक्षीकासाठी केलेला हा बनाव होता.

सदर मॉकड्रिल प्रत्यक्षिकाकरिता माणगांव पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक लहांगे, पोलिस शिपाई रामनाथ डोईफोडे, पोलीस शिपाई  भरत तांदळे, पोलीस शिपाई गोविंद तलवारे, व ३५ आरसीपी जवान असे सदर प्रात्यक्षिकाकरिता हजर होते.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या