माणगांवमध्ये श्री रामनवमीनिमित्त शोभायात्रेचे आयोजन
माणगांव-दि. २८- झपाट्याने विस्तार होणाऱ्या आणि मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या व भौगोलिकदृष्ट्या रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगांव शहरात यावर्षी सन २०२३ रोजी समस्त माणगांवकर हिंदू बांधवांकडून दि. ३० मार्च रोजी श्री रामनवमी, रामजन्मोत्सव व शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उत्सवास खूप वर्षाच्या प्रतिक्षेनंतर प्रथमच समस्त माणगांव शहर व माणगांव तालुक्यातील हिंदू बांधव एकत्र येत आहेत. या नियोजित भव्य दिव्य अशा उत्सवाचे माणगांवचे हे प्रथम वर्ष आहे.
या उत्सवानिमित्ताने माणगांव शहरातुन शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रेचा प्रारंभ दि. ३० मार्च रोजी दुपारी ३:३० वाजता माणगांव विकास कॉलनी येथील श्री साई मंदिर तहसील कार्यालय पटांगण ते कचेरी रोड ते मुंबई गोवा महामार्ग बाजारपेठ ते बालाजी कॉम्प्लेक्स व परत सोनभैरव मंदिर(खांदाड) येथे शोभायात्रेची सांगता होणार आहे. सायंकाळी ७:३० वाजता श्री राम मंदिर खांदाड महाआरती होणार आहे तसेच रात्री ८ वाजता महाप्रसादाचे देखील नियोजन करण्यात आले आहे. या शोभयात्रेत व संपूर्ण कार्यक्रमात माणगांव तालुक्यातील समस्त हिंदू बांधवांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या उत्सवादरम्यान व शोभायात्रेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता माणगांव पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.




0 टिप्पण्या