माझ्यासह कुटुंबाला संपविण्याचा प्रयत्न- उपसरपंच प्रभाकर मानकर

माझ्यासह कुटुंबाला संपविण्याचा प्रयत्न- उपसरपंच प्रभाकर मानकर

कॉईल वाहतुक ट्रेलर व इनोव्हामध्ये अपघात 

अपघात की घातपात?

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. ९- माणगांव तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक क्षेत्रात असणारी पोस्को महाराष्ट्र स्टील या कंपनीच्या व्यवस्थापनाचा अजब गजब कारभाराचे किस्से माणगांव तालुक्यातील नागरिक मागील दोन वर्षापासून बघत आले आहेत. पोस्को महाराष्ट्र स्टील  दक्षिण कोरिया बेस कंपनी विळे भागाड औद्योगिक क्षेत्रात आहे. ही  स्टील प्रोसेसिंग कंपनी आहे. दिघी जेट्टी आणि मुंबईहुन कोलाड सुतारवाडी मार्गे या कंपनीच्या स्टील कॉईलची वाहतूक चालते. मात्र मागील काही दिवसांपासून ह्या कॉईल वाहतूक करणाऱ्या ट्रेलरमुळे विळे विभागात अपघातांची संख्या वाढली आहे.

अशाच प्रकारे दि. ९ मार्च  रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निजामपूर विभागातील कडापे ग्रामपंचायत  उपसरपंच प्रभाकर मानकर हे आपल्या ताब्यातील इनोव्हा कार क्रं एम एच ०६ बी एम १२०८ ही घेवून विळे मार्गे मुंबई कडे जात असताना पोस्को कंपनीचा कॉईल वाहतूक करणारा ट्रेलर क्रं एम एच ४६ बी यु ३६७२ हा मुंबई बाजूकडून पोस्को कंपनीकडे येत असताना विळे गावच्या हद्दीत आर्या हॉटेल समोरील वळणावर विरुद्ध बाजूला येऊन दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली आहे.

या अपघातातील ट्रेलर चालकाचे नाव इनयातुल्ला अब्दुल हकीम रा. उत्तरप्रदेश असे आहे. हा अपघात घडल्यानंतर निजामपूर विळे विभागातील तरुण व ग्रामस्थ यांनी कंपनीकडे येणारे कॉईल ट्रेलरची वाहतूक रोखून धरली. आपली तक्रार माणगांव पोलीस ठाणे येथे देण्यास आलेले अपघात ग्स्त वाहन मालक व कडापे गावचे उपसरपंच प्रभाकर मानकर उपस्थित पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,की हा पोस्को कंपनी कडून हा मला आणि माझ्या कुटुंबाला संपविण्याचा नियोजित कट होता!

सविस्तरपणे बोलताना मानकर म्हणाले की, पोस्को कंपनी दूषित पाणी सोडत असल्याचे कारणाने आम्ही ग्रुप ग्रामपंचायत कडापेच्या माध्यमातून कंपनी प्रशासनाशी बराच असा पत्रव्यवहार केला. त्यानंतर कंपनी प्रशासनाकडून माझ्यावर खोटे खंडणीचे गुन्हे दाखल केले गेले आहेत. रस्ता पूर्ण रिकामा असताना विरुद्ध बाजूने ट्रेलर आणून माझ्या गाडीवर ठोकणे हा घातपाताचा पूर्वनियोजित कट आहे. तसेच माझा कंपनी प्रशासनाकडून वेळोवेळी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

पुढे मानकर म्हणाले की, मी माझ्या वैयक्तिक कामाकरिता पुणे किंवा मुंबईकडे जात असताना कंपनीचे मोठं मोठे ट्रेलर संशयास्पदरित्या माझा पाठलाग करताना दिसून आले आहेत. मात्र मी ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. आजचा अपघाताचा प्रकार म्हणजे पोस्को कंपनी माझ्या व माझ्या कुटूंबाच्या जीवावर उठली आहे असे स्पष्ट होत आहे. माझा आज दाबण्यामागे कंपनी व्यवस्थापनातील अंकुश पाटकर, महेंद्र तट्टे, संजय कुलकर्णी यांचा सहभाग आहे असे मत प्रभाकर मानकर यांनी उपस्थित पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या