हि. म. मेता विद्यालय विळे येथे महिला दिन साजरा

 हि. म. मेता विद्यालय विळे येथे महिला दिन साजरा

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. ८- श्री भैरवनाथ ज्ञान प्रसारक मंडळ संचलित हि. म. मेता माध्यमिक विद्यालय व स्वातंत्र्यसैनिक धनजीभाई भिकू मोदी उच्च माध्यमिक विद्यालय विळे येथे दिनांक ८  रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेचे मुख्याध्यापक  ठाकूर सर यांनी भूषविले. या कार्यक्रमात संस्था सदस्या माया भाभी, डॉक्टर भावना गांधी, ग्रा. पं. सणसवाडी सरपंच श्रीमती सुमिता आनिल नलावडे, ग्रा. पं. विळे उपसरपंच श्रीमती अनिता पांडुरंग देशपांडे व विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका श्रीमती मोदी मॅडम , श्रीमती कुशिरे मॅडम व शालेय पोषण आहार बनवून देणाऱ्या श्रीमती नलावडे  या सर्व  उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तुत्वान महिला म्हणून सत्कार भेटवस्तु व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

यावेळी डॉक्टर भावना गांधी (मेता) यांनी विद्यार्थ्यास मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  बहादुरवाडीकर सर यांनी केले तर महिलांबद्दल महिला सबलीकरण या विषयावर  कांबळे सर यांनी गौरवोद्धगार काढले. या कार्यक्रमात मुख्याध्यापक  ठाकूर सर यांनी उपस्थितांचे  आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या