पळसगाव खुर्द अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन संपन्न.

 पळसगाव खुर्द अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन संपन्न.

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव : दि. २५ - माणगांव तालुक्यातील गांगवली ग्रामपंचायत हद्दीतील पुणे ते किल्ले रायगड महामार्गाला जोडणारा ते पंडम यांच्या घरापर्यंत ते मयूर साठे यांच्या घरापर्यंत या पळसगाव खुर्द अंतर्गत रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. ही बाब लक्षात घेताच पळस गाव खुर्द स्थानिक ग्रामस्थ महेश कांबळे , सखाराम वाजे,गणेश सुतार ,सुरेश ढवळे श्री सहदेव सुतार, मंगेश कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाड पोलादपूर माणगांव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष चंद्रशेखर (बाबुशेठ) खानविलकर यांच्याकडे गावच्या रस्त्याची समस्या मांडली व पत्रव्यवहार केला. ही महत्वाची बाब लक्षात घेता खानविलकर यांनी रायगड लोकसभा खासदार सुनिल तटकरे,विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे त्यांच्याकडे सदर समस्येबाबत सविस्तर विषय मांडला व या कामासाठी आठ लाख रुपये निधी २५/१५ मधून उपलब्ध करून घेतला.

    या कामाचे भूमिपूजन गुढीपाडवा या मुहूर्तावर दिनांक २२ मार्च रोजी चंद्रशेखर( बाबुशेठ) खानविलकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष संदीप जाधव ,सचिव किरण पागार ,ग्रामपंचायत गांगवली सरपंच नेहा रामदास दाखिणकर, मनोहर कांबळे ,महादेव सुतार सहादेव सुतार ,सुरेश घोले, निलेश दाभोळकर ,ज्ञानेश्वर कांबळे, चंद्रकांत वरणकर, विजय सुतार, उमाजी सुतार, पांडुरंग सुतार, रविकांत कांबळे,सखाराम सुतार, आदी उपस्थित होते. भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला त्यावेळेस खासदार सुनिल तटकरे ,आमदार अनिकेत तटकरे व (चंद्रशेखर)बाबुशेठ खानविलकर यांचे पळसगाव खुर्द ग्रामस्थांनी आभार मानले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या