माणगांव पोलिसांनी बाजारपेठेत वेडसरपणे फिरणाऱ्याला दिले नातेवाईकांच्या ताब्यात
माणगांव-दि. २७- माणगांव पोलीस नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. अनेक सामाजिक उपक्रम माणगांव पोलिसांतर्फे राबविले जातात. अशाच प्रकारे माणगांव बाजारपेठेत वेडसरपणे फिरणाऱ्याला माणगांव पोलिसांनी त्याचा नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तरपणे असे की, दि. २७ मार्च रोजी रात्री १ वा. च्या सुमारास विनोद सुरेश पवार, वय ४२ वर्ष, रा. आदर्शनगर जनता कॉलनी, रूम नं. १६९ वरळी गाव मुंबई हा माणगांव बाजारपेठेत वेडसरपणे फिरत असताना मिळून आला. पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या आदेशाने पो. ह. तुणतुणे, पो. ना. मिलिंद खिरीट, पो. शि. राम डोईफोडे यांनी त्याच्या घरी संपर्क साधला. दि. २८ मार्च रोजी त्याचे नातेवाईक आई सुनीता पवार, भाऊ संतोष पवार, पत्नी भावना पवार माणगांव पोलीस ठाणे येथे आले असता विनोद पवार याला सुरक्षित त्यांच्या ताब्यात दिले आहे. पवार कुटूंबियांनी या केलेल्या कार्याबद्दल माणगांव पो. नि. राजेंद्र पाटील व माणगांव पोलिसांचे आभार मानले असून माणगांव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.




0 टिप्पण्या