पन्हळघर खुर्द येथे तालुकास्तरीय नृत्य स्पर्धा..jpeg)
पोलीस प्रवाह न्यूज
गोरेगाव : दि. ७ - छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसारची शिवजयंती पन्हळघर येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्याचे अवचैत्य साधून कलाकारांना त्यांच्या अंगी असलेली नृत्य कला सादर करण्यासाठी पन्हळघर खुर्द येथे सोलो डान्स व ग्रुप डान्स आशा स्पर्धांचे शुक्रवार दि 10 /3/2023 रोजी सांयकाळी 7:30 आयोजन केले आहे. दोन्ही गटात प्रथम येणाऱ्या १२ / १२ स्पर्धकांनाच संधी दिली जाणार आहे.त्यासाठी 8446998838 व 9607842857 या क्रमांकावर संपर्क साधावा असे शिव छत्रपती ग्रुप पन्हळघर यांनी आवाहन केले आहे. ग्रुप डान्स साठी तिनही क्रमांकाची बक्षिसे न्यू स्टार मित्रमंडळ पन्हळघर यांनी दिली असून सोलो डान्सची बक्षिसे शिव छत्रपती ग्रुप ,सचिन उतेकर , व कै. मुकुंद करकरे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबा कडून देण्यात आले आहे.तर दोन्ही गटासाठी लागणारे सर्व सन्मानचिन्ह श्री सदाशिव सखाराम चेरफळे यांचे कडून देण्यात येणार आहे.आयोजकांच्या नियम व अटी लागू असतील.


0 टिप्पण्या