इंदापूर मध्ये भंगार डेपोला आग लाखोंचे नुकसान .
जीवित हानी टळली.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव : दि. ७ - माणगांव तालुक्यातील इंदापूर मध्ये वाढवण पाणसई रोडवर रेल्वे रूळ क्रॉसिंग च्या शेजारी असणाऱ्या बाबा भंगारवाला यांच्या भंगार डेपोला ६ मार्च च्या रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली या आगीमध्ये भंगार डेपोतील लाखोंचा आगीमध्ये भस्मसात झाला आहे.मात्र माणगांव पोलीस टीम व माणगांव नगरपंचायत ची क्यू आर टी van घटनास्थळी वेळेत पोहचल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात आली आणि सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी टळली आहे.
घटनेची माहिती मिळताच माणगांव पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस टीम सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष आस्वर,पोलीस सब इन्स्पेक्टर किर्तीकुमार गायकवाड,पोलीस सब इन्स्पेक्टर अस्मिता पाटील, पोलीस सब इन्स्पेक्टर फडतरे, पोलीस शिपाई ढाकणे,पोलीस शिपाई रामनाथ डोईफोडे, पोलीस शिपाई शिवाजी मिसाळ व माणगांव नगर पंचायत चे QRT वाहनचालक दशरथ गावडे यांच्यासह माणगांव नगरपंचायत टीम घटनास्थळी दाखल झाली व QRT van च्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. यामुळे वित्तीय नुकसान जरी झाले असले तरी माणगांव पोलीस टीम व माणगांव नगरपंचायत टीम योग्यवेळी घटनास्थळी दाखल झाली.या कार्यामुळे दोन्ही टीम चे माणगांव तालुक्यातुन कौतुक होत आहे.




0 टिप्पण्या