सोनार समाजामध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रम संपन्न = 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य.

 अखिल भारतीय सुवर्णकार समाज संघर्ष कृती समिती कोल्हापुर 


पोलीस प्रवाह न्यूज 

      कोल्हापुर : दि.६. संस्थेच्या वतीने 8 मार्च रोजी होणाऱ्या महिला दिनानिमित्ताने महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन रविवार दि- 05/03/2023 रोजी ऋतुराज मल्टीपरपज हॉल, कुपवाड येथे करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र पोतदार कुरुंदवाड यांनी समाज संघटनेत आणि प्रगती मध्ये महिलांचे योगदान कसे महत्त्वाचे आहे हे सांगितले. प्रमुख पाहुणे श्रीमती जयश्री प्रसाद धर्माधिकारी यांनी महिलांनी पुढे येऊन समाज विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्या विषयी आवाहन केले. तसेच श्रीमती शोभा शशिकांत दिक्षीत यांनी स्त्री भ्रूणहत्या होऊ देऊ नका. समाजात तसेच परीचयातील कुठेही स्त्री भ्रूणहत्या होत असेल, तर त्याचा विरोध करा. त्यांचे समुपदेशन करा, असा संदेश उपस्थित महिलांना दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नंदकुमार वेदपाठक यांनी केले.तर समाज संघटीत होण्याचे महत्त्व श्री शितल पोतदार रेंदाळ यांनी सांगितले.  समाजातील महिला भगिनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी फनीगेम्स, विविध कला गुण व प्रश्न मंजुषा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिलांच्या कलागुणांना वाव दिल्या बद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वसुधा रोहित माणकापुरे (कोगनोळी) व कु. आकांक्षा राजेंद्र पोतदार (कुरुंदवाड) यांनी केले आणि आभार प्रदर्शन सौ. शानदा सुहास दिक्षीत कुपवाड यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या