माणगांव येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालयाचा उदघाटन समारंभ संपन्न
या न्यायालयामुळे पक्षकारांना जलद व योग्य न्याय मिळेल- न्यायमुर्ती अमित बोरकर
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. ६- माणगांव जिल्हा रायगड अलिबाग येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचा उदघाटन समारंभ रविवार दि. ५ मार्च रोजी माणगांव जिल्हा सत्र न्यायालय परिसरात पार पडला. या न्यायालयामुळे येथील पक्षकारांना जलद व योग्य न्याय मिळेल असे उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती रायगड जिल्हा अलिबाग अमित बोरकर यांनी सांगितले.
उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती रायगड जिल्हा अलिबाग अमित बोरकर यांच्या शुभहस्ते हा उदघाटन सोहळा पार पडला. सुरुवातीला न्यायालय कक्षाचे उदघाटन केल्यानंतर राज्यगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शैलजा सावंत, जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश नवनाथ कोले, न्यायाधीश फुझळके, साटोटे, पाठारे, निवृत्त न्यायाधीश जहांगीरदार, मा. पालकमंत्री आदिती तटकरे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, माणगांव बार असोसिएशन अध्यक्ष ऍड. महेंद्र मानकर, ऍड. राजीव साबळे, पोलीस उपजिल्हा अधीक्षक अतुल झेंडे, ऍड. विनोद घायाळ, माणगांव नगर पंचायत नगरसेवक, श्रीवर्धन, महाड, रोहा, बार असोसिएशन सदस्य, वकील, पक्षकार व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीवर्धन म्हसळा, माणगाव, तळा, रोहा व पाली या महसुली तालुक्यांकरिता माणगाव, जिल्हा रायगड येथे दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, माणगाव न्यायालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव मा.उच्च न्यायालयास सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मा.उच्च न्यायालयाने मंजूरी दिली असून त्याबाबतची अधिसूचना विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मा. मंत्री आदिती तटकरे यांचा सिंहाचा वाटा आहे असून या न्यायालयाच्या मंजुरीसाठी आ. भरत गोगावले, खा. सुनील तटकरे, ऍड. राजीव साबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे प्रस्ताविकेत ऍड. महेंद्र माणकर यांनी सांगितले.








0 टिप्पण्या