माणगांवमध्ये पद्मश्री ऍड उज्वल निकम यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न
माणगांव-दि. ६- माणगांवमध्ये हरिओम चॅरिटेबल असोसिएशन (मुंबई) यांच्यामार्फत माणगांवच्या लोकनेते अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठान लला देण्यात आलेल्या सी एन जी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा दिनांक ६ मार्च रोजी अशोकदादा साबळे विधी महाविद्यालयाच्या पटांगणात मा. पद्मश्री ऍड उज्वल निकम यांच्या शुभहस्ते सकाळी १०:३० वाजता पार पडला.
या कार्यक्रम प्रसंगी ऍड ल. राजीव साबळे यांच्या समवेत माणगांव नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, नगरसेवक अजित तार्लेकर, कपिल गायकवाड, दिनेश रातवडकर, राजेश मेहता, सामाजिक कार्यकर्ते वैभव साबळे, शिवसेना शहर प्रमुख सुनील पवार, उपशहर प्रमुख प्रसाद धारिया, नितीन दसवते, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण (बाळा) दळवी, डॉ आबासाहेब पाटणकर, नितीन बामुगडे, नितीन दसवते, ऍड विनोद घायाळ, विरेश येरूणकर आणि माणगांव द ग तटकरे महाविद्यालय, अशोकदादा साबळे महाविद्यालय, अशोकदादा साबळे विधी महाविद्यालयाचे शिक्षकवृंद व कर्मचारीवृंद तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना पद्मश्री ऍड. उज्वल निकम म्हणाले की, हरिओम चॅरिटेबल असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा भाई यांसारखे दाते असल्यामुळे ग्रामीण जनतेला याचा फायदा होत आहे. तर ऍड उज्वल निकम यांच्या सह आलेले माणिक सर म्हणाले की, या रुग्णवाहिकेचा वापर कमीत कमी व्हावा जेणेकरून कोणीही जास्त आजारी पडू नये, कुणाचाही अपघात घडू नये आणि जर तसाच प्रसंग उद्भवल्यास रुग्णांना किंवा अपघातग्रस्तांना अल्पदरात ही रुग्णवाहिका उपलब्ध होईल असाच उद्देश दृष्टीक्षेपात ठेवण्यात आला आहे. तसेच ऍड उज्वल निकम म्हणाले की, हा रुग्णवाहिका लोकपर्ण सोहळा आज या माणगांवच्या विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला आहे.), असे विधी महाविद्यालय प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जेणेकरून या ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगल्या पद्धतीचे वकील घडतील, असा आशावाद व्यक्त केला व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यासोबत माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड राजीव साबळे यांच्या कार्याचे कौतुक केले.





0 टिप्पण्या