पोस्को कंपनी तर्फे हि.म मेता माध्यमिक विद्यालय विळे येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

 पोस्को कंपनी तर्फे हि.म मेता माध्यमिक विद्यालय विळे येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि.४- विळे भागाड औद्योगिक क्षेत्रातील पोस्को कंपनीच्यावतीने  शनिवार दि. ४ मार्च रोजी हिरालाल महादेव मेता माध्यमिक विद्यालय व स्वा सै.ध.भि. मोदी उच्च माध्यमिक विद्यालय विळे येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप करण्यात आले. 

सदर कार्यक्रम हा हारमन ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक मनिंदर सिंग जी उर्फ मननुजी यांच्यावतीने करण्यात आला. या शैक्षणिक साहित्यामध्ये दप्तर ,पेन्सिल बॉक्स, पेन बॉक्स ,कंपास ,पाणी बॉटल इत्यादी बाबी असून त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. पुढील शैक्षणिक वर्षासाठी ५१ विद्यार्थ्यांना शालेय गणवेशासाठी श्रीयुत हारमन ट्रान्सपोर्ट यांचे वतीने गणवेशासाठी २५ हजार व इतर शालेय कामकाजासाठी २५ हजार देणगी देण्यात आली. 

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष  सुभाष भाई मेथा, उपाध्यक्ष  प्रकाश  मेहता, मुख्याध्यापक  ठाकूर सर, उपसेक्रेटरी बामणे, कार्याध्यक्ष पांडुरंग नलावडे व संस्था चालक  ताम्हणकर  हे उपस्थित होते. 

कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर  सांगुलीकर  हे मुख्य अतिथी होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कोरिया व भारत यांच्या जुन्या संबंधांबद्दल सांगितले.  कांबळे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुधीर भोसले यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी विनायक बाईत व दीपक ढवन यांचेही विशेष सहकार्य लाभले. त्यावेळी शाळेसाठी विज्ञान प्रयोगशाळा व विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा करण्याची मागणी करण्यात आली. शेवटी घोरपडे सर यांनी आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या