बिबटयाची कातडी हस्तगत करून ते अनाधिकृतरीत्या जवळ बाळगुन विक्री करणाऱ्या इसमास अटक

बिबटयाची कातडी हस्तगत करून ते अनाधिकृतरीत्या जवळ बाळगुन विक्री करणाऱ्या इसमास अटक

पोलीस प्रवाह न्यूज

नवी मुंबई- दि.३- बिबटया हा वन्य प्राणी अन्नसाखळी मधील महत्त्वाचा घटक आहे. त्याची तस्करी होवून तो नामशेष झाला तर पूर्ण अन्नसाखळी व पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्राण्याची शिकार, अवयवांची तस्करी करणाऱ्या कृत्यांना आळा घालणेबाबत  पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमित काळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) विनायक वस्त यांनी आदेश दिले होते.



दिनांक २८ फेब्रुवारी रोजी गुन्हेशाखा, कक्ष-०२, पनवेल यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, दिनांक २८ फेब्रुवारी रोजी मुंबई गोवा हायवे रोडवरील खारपाडा टोलनाका जवळील वैष्णवी हॉटेल जवळ एक इसम दुर्मिळ प्रजातीचे नामशेष होत असलेल्या संरक्षित वन्यजीव बिबटयाची कातडी अनाधिकृतरीत्या जवळ बाळगुन विक्री करण्यासाठी येणार आहे अशी बातमी प्राप्त झाली. मिळालेल्या बातमीची शहानिशा करून पोनि रविंद्र पाटील यांनी वरिष्ठांना अवगत केले. वरिष्ठांच्या आदेशान्वये एक पोलीस पथक तयार करून पंच, वन विभागाचे अधिकारी व छाप्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह नमूद ठिकाणी रवाना झाले व सापळा लावला. काही वेळाने एक इसम त्याच्या उजव्या खांदयावर बॅग लटकवुन खारपाडा ब्रिज बाजुने खारपाडा टोलनाक्याकडे येत असताना दिसला. त्याला पाहताच सोबत असलेल्या बातमीदाराने ठरल्या प्रमाणे इशारा केला. सदरचा इसम हा खारपाडा टोलनाका येथील मुंबई बाजुचे डावे लेनवर आला असता पोलीस पथकाने नमुद इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्याचेकडील बॅगसह ताब्यात घेतले. सदर बाबत नवीन पनवेल पोलीस ठाणे येथे गु. रजि. क्र. ४८/२३ वन्यजिव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९(१), ४९, ५१ प्रमाणे करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव जितेंद्र खोतू पवार उर्फ संजु, वय-३१ वर्षे, धंदा-मजुरी, रा. मंडणगड सार्वजनिक चावडी शेजारी, पो.ता. मंडणगड, जि. रत्नागिरी असे असल्याचे सांगितले. 
ताब्यात घेण्यात आलेल्या मुद्देमालाचे वर्णन :- बिबटया या वन्य प्राण्याचे उग्र वास येत असलेले पिवळ्या रंगाचे कातडे, त्यावर काळे रंगाचे ठिपके.



सदरची यशस्वी कामगिरी कक्ष ०२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, सहा. पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे, संदिप गायकवाड, पोलिस उप निरीक्षक मानसिंग पाटील, दिलीप भंडे, पो. हवा. अनिल पाटील, दिपक डोंगरे, सचिन पवार, रमेश शिंदे, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकराम सुर्यवंशी, अजित पाटील, जगदिश तांडेल, ज्ञानेश्वर वाघ, निलेश पाटील, राहुल पवार, सागर रसाळ, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, पो. ना. अजिनाथ फुंदे, प्रफुल मोरे, नंदकुमार ढगे, अभय मेन्या, पो.शि. संजय पाटील, विक्रांत माळी तसेच परिक्षेत्र वन अधिकारी पनवेल यांचे मार्फत वनरक्षक माणिकअप्पा घोंगडे, वनपाल गणपत चव्हाण यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या