पोस्को कंपनीतर्फे रा.जि.प. शाळांमध्ये विज्ञान संच वाटप व उद्बोधन, प्रेरणा प्रकल्प.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव तालुक्यातील भागाड येथील बहुराष्ट्रीय कंपनी पोस्को महाराष्ट्र स्टील ही आपल्या मुख्य व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अनेक उपक्रम कंपनी परिसरात सातत्याने करत असते. यावर्षी (२०२३) कंपनीने प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पनांना चालना मिळावी यादृष्टीने दहा प्रकारच्या विविध प्रयोगांचे साहित्य कोरिया मधून मागवले व त्याचे जोडणीचे प्रात्यक्षिक व प्रेरणा देण्याचे कार्यक्रम कंपनीच्या आसपासच्या १५ शाळांमध्ये चालू आहेत. कंपनी मधील विविध विभागांतील कर्मचारी यात सहभागी होऊन ठरलेल्या शाळांमध्ये जावून या सुट्या भागांची जोडणी थोडी मजेदार पद्धतीने विद्यार्थ्यांना त्यांच्या सहभागातून करून दाखवत आहेत.
सौर उर्जेवर चालणारी कार व बोट, सौर कुकर, पाण्यापासून चालणारे घड्याळ असे सोपे प्रयोग पाहून व त्याची नियोजनबद्ध जोडणी पाहून विद्यार्थ्यांमधील विज्ञान विषयक उत्कंठा नक्की प्रज्वलित होईल व त्यांना या विषयाबद्दल आवड निर्माण होईल असा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
वरील कार्यक्रमांत ज्या शाळांचा सहभाग आहे त्या शाळांमधील शिक्षकांची पोस्को कंपनी भेट हाही उपक्रम सोबत चालू आहे, यातून एका मोठ्या उद्योगाचे थोडक्यात दर्शन व ही प्रेरणा शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवावी अशी अपेक्षा आहे. कोरिया हा तसा भौगोलिक आकाराने अत्यंत छोटा पण त्यांच्यातील व्यावसायिक कर्तृत्वाने जगात जवळपास सगळ्यांच्या घराघरात पोहोचलेला देश आहे. शिक्षकांनी ही उद्योग प्रेरणा विद्यार्थ्यांना त्यांच्या जडण-घडणीच्या वयात प्रज्वलित केली तर भारताने घेतलेली उद्योग भरारी आणखी उंच जावू शकेल यासाठीचा हा पोस्को कंपनीचा खारीचा वाटा रुपी प्रामाणिक प्रयत्न.






0 टिप्पण्या