खासदार संजय राऊत यांच्याविरोधात माणगांवमध्ये जोडे मारो आंदोलन
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. २- खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळ चोर आहे,अशा प्रकारच्या केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात सत्ताधारी शिवसेनेकडून तीव्र संताप व्यक्त करत निषेध देखील व्यक्त केला जात आहे. याच धर्तीवर आमदार भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई गोवा महार्गावर माणगांव बस स्थानकासमोरील पोलीस चौकी समोर माणगांव तालुक्यातील शिवसैनिक व युवासैनिकानी खासदार संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले.
संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली.
यावेळी शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, शिवसेना नेते ऍड राजीव साबळे, युवा सेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, युवासेना उपजिल्हा प्रमुख अविनाश नलावडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख निलिमा घोसाळकर, महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख शर्मिला सुर्वे, तालुका प्रमुख अरुणा वाघमारे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चाळके, युवासेना उपतालुका प्रमुख स्वप्नील शिर्के, निजामपूर विभाग प्रमुख मनोज सावंत, युवासेना तालुका सचिव जितेंद्र तेटगुरे, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, शिवसेना उपतालुका प्रमुख नितीन पवार, प्रताप घोसाळकर, अच्युत तोडलेकर, निलम भोसले, कुमुद जाधव, करुणा देसाई, माणगांव नगरपंचायत शिवसेनेच्या सर्व नगरसेविका व नगरसेवक व शिवसेना विविध सेल व आघाड्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.




0 टिप्पण्या