गुढीपाडव्या निमित्त लोणेरे येथे संजीवनी क्लासेस वतीने रॅलीचे आयोजन

 गुढीपाडव्या निमित्त लोणेरे येथे संजीवनी क्लासेस वतीने रॅलीचे आयोजन

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. २२- कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने लोणेरे येथील नामांकित  संजीवनी क्लासेसच्या वतीने भव्य दिव्य रॅलीचे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते.

रॅली सकाळी ठीक आठ वाजता संजीवनी क्लासेस येथून ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती. यावेळी लेझीम पथककाचे आयोजन करण्यात आले होते. रॅली अगदी शिस्तबद्ध पद्धतीने लोणेरे बाजार, लोणेरे गाव नवघर या ठिकाणी काढण्यात आली. यावेळी संजीवनी क्लासेसचे आजी-माजी विद्यार्थी विद्यार्थिनी पारंपारिक वेशभूषा करून मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. त्यावेळी पटनाट्य करून मराठी वर्षाच्या जनतेला संदेश देत शुभेच्छा दिल्या. यावेळी रॅलीमध्ये शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण चाळके, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.  रॅलीचे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात अभिनंदन करण्यात आले रॅलीचे आयोजन संजीवनी क्लासेसचे शिक्षक संजय उभारे आणि शिक्षिका सौ. संजीवनी संजय उभारे यांनी उत्तम प्रकारे नियोजन करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन पाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या