पोस्को कंपनीमध्ये भारतीय नवीन वर्षाची पूर्वसंध्या रक्तदानाने साजरी

 पोस्को कंपनीमध्ये भारतीय नवीन वर्षाची पूर्वसंध्या रक्तदानाने साजरी

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. २१- जवळपास गेली दीड वर्ष पेक्षा अधिक कालावधीत पोस्को कंपनीतील कर्मचारी वर्ग कंपनीची व स्वतःची सामाजिक जबाबदारीचे भान राखत दर तीन महिन्यांतून एकदा रक्तदान शिबीर आयोजित करते. २०२२ मधे कंपनींतील CSR विभागाने अशी चार शिबिरे आयोजित करून ३७१ युनिट रक्त, रक्तदान मोहिमेत देऊन आपली या अत्यंत गरजेच्या विषयांतील सक्षम व संवेदनशील जबाबदारी पार पडण्याचा प्रयत्न केला. आज दिनांक २१ मार्च रोजी २०२३ मधील पहिले रक्तदान शिबीर पार पडले व रक्तपेढीच्या आवश्यकतेनुसार ४० युनिट रक्तदान घेण्यात आले व पुढील गरजेच्या वेळी अश्या प्रकारचे शिबीर किमान कालावधीत आयोजित करता येईल असे आश्वासन कंपनीचे अधिकारी श्री संजय कुलकर्णी यांनी रक्तदान शिबीराचे उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले.

पोस्को कंपनी सदैव समाजउपयोगी कामांत सतत अग्रेसर आहे व राहील, आणि असे वातावरण आपल्या कर्मचार्यांच्या मनांतही या व अश्या अन्य उपक्रमांतून निर्माण करीत राहील असा विश्वास या निमित्ताने अनुभवायला मिळत होता. पुढील काळात रक्तदान विषयाची जनजागृती तसेच नियमित रक्तदात्यांचा सन्मान करण्याचा कंपनी व्यवस्थापनाचा मानस आहे. सदर रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जनकल्याण रक्त केंद्र महाड यांचे  सहकार्य लाभले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या