सावधान डी.जे समोर जे नाचणार ते जीवाला मुकणार - डॉ रोकडे.
पोलीस प्रवाह न्यूज
आजकाल लग्न असो किंवा कोणतेही कार्य असो जयंती असो किंवा मिरवणूक असो बँड पथका ऐवजी सर्रास डीजे चा वापर केला जातो.
एवढा मोठा कर्कश आवाज आणि तर डीजेच्या बेस साऊंड मुळे आजूबाजूची जमीन हादरते, आजूबाजूचे जुनी माळवाद असतील जुनी बांधकाम असतील त्याची माती आपोआप पडायला सुरुवात होते ,आजकालच्या तरुण पिढीला डीजेची एवढी भुरळ पडलेले आहे की एकमेकांच्या जिद्दी वरती सर्वात जास्त वाजणारा डीजेला तासाला लाखो रुपये मोजतात, डीजे मुळे बँड पथकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे, पूर्वी लग्न असो कोणतेही समारंभ असो जयंती असो मोठ्या मोठ्या उत्सवा मध्ये फक्त आणि फक्त बँड पथकाचंच वादन होत असत, जास्तीत जास्त आवाज म्हटलं तर बँजो पथक चा वापर होत असे ,यामुळे किमान लोकांना कर्कश्य आवाजाचा त्रास तरी होत नसत, परंतु बदलत्या काळानुसार आपण पाहत आहात डीजे चा प्रत्येक ठिकाणी अतिवापर होत असून त्यामुळे तरुण पिढीमध्ये आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे, कारण मनुष्या हा साधारण 60 डेसिबल पर्यंतचा आवाज सहन करू शकते ,परंतु डीजेचा आवाज यापेक्षा कितीतरी पटीने जास्तीत जास्त असतो ,यामुळे मनुष्याच्या शरीराची किती हानी होत असेल, मोठ्या कर्कश्य आवाजामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो , डीजेच्या बेस च्या कंपनामुळे अनेकांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो, आपण अनेक वेळा वर्तमानपत्रात वाचतो की डीजे समोर नाचताना चक्कर येऊन तरुणाचा मृत्यू अशातच शहरामध्ये किंवा अति संवेदनशील ठिकाणी डी.जे चा वापरास कायद्यानुसार बंदी असूनही आवाजाची कोणतीही मर्यादा डि.जे वाले पाळत नाहीत , जयंतीला किंवा मोठ्या उत्सवांना पोलीस प्रशासनाकडून डी.जे चालकांना तंबी देण्यात येते की कमीत कमी 80/90 डेसिबल आवाज हवा ,परंतु ते नियम कागदोपत्रेच राहतात ,आणि मोठ्या प्रमाणात कर्कश आवाजात डीजे वाजवले जातात यांच्यापुढे पोलिसा प्रशासनाचाही नाईलाज होतो ,कारण जेव्हा पोलीस प्रशासन अशा डी.जे चालकांना किंवा मंडळाच्या लोकांना आवाजाबद्दल मज्जाव करते, तेव्हा पोलीस प्रशासनावरती सुद्धा वरून पुढाऱ्यांचा दबाव येतो मी अमुक पक्षाचा मी तमुक पक्षाचा मी आमदार मी खासदार माझ्या मंडळातील मुल आहेत. त्यांना नाचू द्या कायद्यात एवढ्या कडक तरतुदी असूनही राजकारणी लोक कायद्याची पायमल्ली करतात , यामुळे पोलीस प्रशासनालाही नाईलाजाने डीजे पथकावरती कारवाई करता येत नाही, वास्तविक पाहता डीजे चा अवजड गाड्यांना आरटीओ ची कायद्यानुसार परवानगी नसते परंतु डीजे चालक एकमेकांशी स्पर्धा करून मोठ्यात मोठ्या गाड्या मोठ्यात मोठी डीजे सिस्टीम उभी करतात.
आज-काल डीजेच्या मोठ्या मोठ्या गाड्या तयार झाल्यामुळे आमच्या बँड पथकातील वादकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे, याची सरकारने दखल घ्यायला हवी , तरच बँड वादकाच काम चालू होईल - मुख्तार पठाण रज्जाक बँड करमाळा.



0 टिप्पण्या