आ. आदिती तटकरे यांच्या माध्यमातून माणगांवमध्ये सुमारे ४ कोटी ५८ लाखांच्या रस्त्याच्या कामांना मंजुरी.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव : दि. ११ - श्रीवर्धन विधानसभा आमदार तथा रायगड जिल्हा मा. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून व पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा २ जिल्हावार्षिक योजनेतून माणगांव तालुक्यातील ४ कोटी ५८ लाखांच्या रस्ते कामांना मंजुरी मिळाली आहे.
यामध्ये चापडी उणेगाव रस्ता सुमारे १ कोटी ६३ लाख, राष्ट्रीय महामार्ग ते निळगुण, बामणोली, राजीवली रस्ता सुमारे १ कोटी ३१ लाख, ढालघर ते लोणशी मोहल्ला बौद्धवाडी ते वावे रोहिदासवाडी रस्ता सुमारे १ कोटी ६४ लाख असे एकूण सुमारे ४ कोटी ५८ लाखांच्या कामांचा समावेश आहे.
श्रीवर्धन मतदारसंघ तसेच माणगांव तालुक्यांतील ग्रामपंचायत असो किंवा नगर पंचायत हद्दीतील विकास कामे असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. याचे कारण म्हणजे खासदार तटकरे कुटुंबियांचे श्रीवर्धन मतदारसंघ व माणगांव शहरावर असलेले विशेष प्रेम आणि नेहमीच माणगांवकरांच्या विकासाकरिता दिलेले झुकते माप यामुळे माणगाव शहराचा व श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचा विकास केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करूच शकते असा विश्वास नागरिकांच्या मनात ठासून भरला आहे.
माणगांव तालुक्यातील विकास कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस माणगांव तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे यांनी आ. आदिती तटकरे यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून श्रीवर्धन मतदारसंघात व तसेच संपूर्ण माणगांव तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. या कामांना मंजुरी मिळाल्याबद्दल आ. आदिती तटकरे व रा. कॉ. मा. ता. अध्यक्ष सुभाष केकाणे यांचे ग्राम पंचायत उणेगाव सरपंच राजेंद्र शिर्के यांनी विशेष आभार मानले आहेत.

.jpeg)

0 टिप्पण्या