शिवसैनिक आकाश अशोक पांचाळ यांच्या तर्फे ज्ञानदीप बालक आश्रम दिघी, पुणे येथे जीवनावश्यक वस्तूंची मदत
पुणे-दि. २१- शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक आकाश अशोक पांचाळ यांच्या ज्ञानदीप बालक आश्रम दिघी, पुणे येथे दि. १८ मार्च रोजी जीवनावश्यक वस्तूंची मदत संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र शिंदे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
शिवसैनीक आकाश पांचाळ यांचे सामाजिक क्षेत्रात कार्य अग्रेसर आहे. त्यांच्यामार्फत अनेक गरीब व गरजू लोकांना वेळोवेळी मदत करण्यात येते. संपूर्ण राज्यात त्यांचे समाजकार्य सुरू आहे. लवकरच गरीब व गरजू लोकांसाठी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करणार असून जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचून त्यांना मदत करण्याचे काम सुरू आहे.
यावेळी शिवसैनिक आकाश अशोक पांचाळ, ओम गडगडे, राहुल मेस्त्री, जगदीश पाटील, वैभव इकलारे, प्रतिक साळुंके, सुधीर सोनावणे, पारससिंग राजपूत, अभिषेक टाकरस व ज्ञानदीप अनाथ आश्रम मधील मुले उपस्थित होती.



0 टिप्पण्या