माणगांवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित वैशाली सामंत लाईव्ह कार्यक्रम दणक्यात

 माणगांवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित वैशाली सामंत लाईव्ह कार्यक्रम दणक्यात

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव- दि.- २६- रायगड रत्नागिरी खासदार सुनील तटकरे, माजी पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व माणगांव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यातर्फे दि. २५ फेब्रुवारी रोजी संपूर्ण माणगांवकर रसिकांसाठी ऐका दाजीबा फेम सुप्रसिद्ध गायिका 'वैशाली सामंत लाइव्ह' या कार्यक्रमाचे आयोजन बामणोली रोड माणगांव टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेज च्या भव्य पटांगणात करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला माजी पालकमंत्री आदीती तटकरे व विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे व जे बी सावंत एज्युकेशन सोसायटीचे सचिव जयवंत (नानासाहेब) सावंत, डॉ. संतोष कामेरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्याच हस्ते या कार्यक्रमाच्या उद्घाटन करण्यात आले.


हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी माणगांव तालुका राष्ट्रवादी काँगेस पार्टी अध्यक्ष सुभाष केकाणे, महिला आघाडी अध्यक्ष संगिता बक्कम, माणगांव शहर अध्यक्ष नितीन वाढवळ, महिला शहर अध्यक्षा योगिता चव्हाण, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक आनंद यादव, माजी उपनगराध्यक्ष दिलीप (बबडी) जाधव, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, नगरसेविका रिया उभारे, संदीप खरंगटे, जयंत बोडेरे, नगरसेविका हर्षदा काळे, सुविधा खैरे, सुशिला वाढवळ, शेकाप नगरसेविका ममता थोरे, महिला उपाध्यक्ष श्रद्धा यादव, गणेश चव्हाण, राष्ट्रवादी काँगेसचे सर्व नगरसेवक नगरसेविका, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी रुपेश तोडकर, चेतन गावणकर, सुमित काळे,  सौरव चांदोरकर, महिला पदाधिकारी संगिता चव्हाण, किशोरी हिरवे, युवा नेते विक्रांत गायकवाड, सिद्धांत देसाई, विलास यादव आदी व तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणगांव तालुक्यातील विविध सेलच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

सायंकाळी ७ ते रात्रौ १० वाजेपर्यंत सदाबहार गाण्यांची मैफिल सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजात लाईव्ह तमाम माणगांवकर नागरिकांना पहायला व ऐकायला मिळाली. तालुक्यातील सुमारे हजारो नागरिकांनी या राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या