आ. आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते कुडगाव येथे मसाला गिरीणीचे उद्घाटन
श्रीवर्धन-दि. २२- श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव येथे दिघी पोर्ट लिमिटेड यांच्या सौजन्याने अदानी फाउंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून श्री. महालक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला बचत गट कुडगाव यांना देण्यात आलेल्या मसाला गिरणीचे उद्घाटन आमदार आदिती तटकरे यांच्या शुभहास्ते करण्यात आले.
यावेळी अदानी फाउंडेशनचे अरविंदसिंग बेदी, रुषल पटेल, जयश्री काळे, जगन्नाथ खारगावकर,तसेच सर्व ग्रामस्थ मंडळ, महिला, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अदानी फाउंडेशनच्या माध्यमातून या महिलांना मसाला गिरणी हाताळण्यासंदर्भात तसेच उत्पादन व विक्री व्यावसायिक दृष्ट्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी प्रशिक्षण, गांडूळ खत, मशरूम उत्पादन प्रशिक्षण, आळंबी प्रकल्प, मुलांच्या शिक्षणाप्रती लोकांमध्ये जागरूकता, गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आर्थिक उत्पन्न वाढीसाठी उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे, मोफत आरोग्य शिबिर, त्याचबरोबर इत्यादी बाबी जोपासत अदानी फाउंडेशनच्या माध्यमातून धूर विरहित चूल, वर्मी बेड तसेच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करित रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी गावच्या सर्वांगीण विकासासाठी अदानी फाउंडेशन विविध गोष्टींनी परिपूर्ण वाटचाल करीत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे. यावेळी सर्व कुडगाव ग्रामस्थांना शुभेच्छा देत अदानी फाऊंडेशनचर आभार मानले.






0 टिप्पण्या