स्वयंभू शंकर मंदिर मांगवली जिर्णोद्धार व कलशारोहण सोहळा संपन्न

 स्वयंभू शंकर मंदिर मांगवली जिर्णोद्धार व कलशारोहण सोहळा संपन्न.


पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. २२- माणगांव तालुक्यातील मांगवली गावातील श्री स्वयंभू शंकर मंदिराचा जीर्णोद्धार कलशारोहन व नूतन मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा दि.  १६ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या दिमाखदार पध्दतीने संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन रायगड लोकसभेचे खासदार सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते पार पडले. या मंदिर कामासाठी रु. १० लाखाचा निधी श्रीवर्धन विधानसभा आमदार व माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी  आमदार निधीतून उपलब्ध करून दिला.

या चार दिवसीय सोहळ्यामध्ये गुरुवारी दि.१६ फेब्रुवारी रोजी देवाची मिरवणूक, मंदिर प्रवेश, गणेशपूजन, पुण्यावाचन, प्रसाद वास्तू, होमहवन, मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा, महाआरती, ग्रामस्थ मंडळ भजन, शुक्रवारी १७ फेब्रुवारी रोजी मिरवणूक, कलशा रोहण, आरती, महिला हळदी कुंकू, भजनाचे जंगी सामने, शनिवारी महाशिवरात्री उत्सव, दुपारी खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ, हरिपाठ मांगवली कळमजे निळगुण ग्रुप, ह.भ.प. अनिता रावसाहेब जाधव यांचे कीर्तन रविवारी दि. १९ फेब्रुवारी रोजी सत्यनारायण महापूजा व आरती अशा स्वरूपात सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार सुनिल तटकरे यांच्या समवेत माणगांव तालुका राष्ट्रवादी काँगेस अध्यक्ष सुभाष केकाणे, पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर, उणेगाव सरपंच राजेंद्र शिर्के व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेल चे पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी ग्रामस्थ ग्राम पंचायत उपसरपंच मंगेश पवार, सदस्य उज्वला पाखुर्डे, स्वाती पाखुर्डे, पोलीस पाटील माई पवार, अध्यक्ष रमेश पाखुर्डे, काशीराम  पाखुर्डे, माजी सरपंच बाबू पाखुर्डे, माजी उपसरपंच प्रविण पाखुर्डे, रमेश पाखुर्डे, विजय पवार, तुकाराम पाखुर्डे, बाळाराम खाडे, शैलेश पाखुर्डे, विजय पाखुर्डे, समीर पवार, संजय पवार, सदू पवार, रामचंद्र पाखुर्डे, शंकर पाखुर्डे, राम पाखुर्डे,  रमेश वाडेकर, राजाराम पाखुर्डे, दत्ताराम पवार, समीर पाखुर्डे, वितेश पाखुर्डे, राकेश पाखुर्डे, मिलिंद पाखुरडे, आल्पेश पाखुर्डे, शिवाजी पवार, धनराज पवार, विनोद पाखुर्डे, जितेंद्र तेटगुरे, लक्ष्मण पाखुर्डे, दत्ताराम का. पाखुर्डे, तुकाराम सी. पाखुर्डे, दत्ताराम पाखुर्डे, स्नेहा खाडे, सदस्य सुशांत पडवळ, अनंत पवार, सतीश पवार, दिनेश पाखुर्डे, नथुराम पाखुर्डे, महेश सुतार, सुनील पाखुर्डे, बळीराम पाखुर्डे, तुकाराम पाखुर्डे यांनी मेहनत घेतली.

या मंदिराच्या सभामंडप व संरक्षक आमदार भरत गोगावले यांनी अंदाजित रक्कम १० लक्षच्या कामाचे भूमिपूजन देखिल शनिवारी सायंकाळी आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडले. ग्रामस्थ माहेरवाशिण महिला मंडळ, दानशूर व्यक्ती देणगीदार, शिवभक्त मित्र मंडळ मांगवली यांच्या सहकार्याने ना भूतो ना भविष्यती असा हा हृदय स्पर्शी सोहळा पार पाडला. ग्रामस्थांनी कोणतेही राजकारण आड न आणता सर्व मान्यवरांचे स्वागत व आभार मानले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या