त्या मच्छीमार महिलेचा पैशांसाठी दगडाने ठेचून खून; तेवीस वर्षे नराधम युवकाच्या मुसक्या आवळल्या
रत्नागिरी पोलिसांनी लावला सात दिवसात खुनाचा छडा
पोलीस प्रवाह न्यूज
रत्नागिरी-दि. २२- मच्छी विक्री करणाऱ्या एका पन्नास वर्षे महिलेचा खून संगमेश्वर तालुक्यात डिंगणी परिसरात झाला होता. या खुनाने मोठी खळबळ उडाली होती. अखेर या खुनाच्या प्रकरणी २३ वर्षीय युवकाला अटक करण्यात मोठे यश आला आहे. संशयित आरोपी जयेश रमेश गमरे यानेच हा खून पैशासाठी केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. अत्यंत दुर्गम व जंगलमय भागात हा खून केल्यानंतर कोणतेच पुरावे नसल्याने खुनाप्रकरणी तपास करण्याचे मोठ आव्हान रत्नागिरी पोलिसांसमोर होते. मात्र जंगल परिसराजवळ असलेल्या गावांमध्ये माहिती मिळवून या संशयित तरुणावरती पाळत ठेवून मोबाईल मधील तांत्रिक लोकेशन आदीच्या आधारे त्याच्या मुसक्या संगमेश्वर पोलिसांनी आवळल्या आहेत. या संशयित नराधम तरुणाने या महिलेचा दगडाने ठेचून खून करून पुरावे नष्ट केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
दि. १५ फेब्रुवारी रोजी पिरंदवणे, संगमेश्वर येथील जंगलमय पायवाटेवरून विविध वाड्या व गावांमध्ये किरकोळ मासे विक्री करून आपला उदरनिर्वाह करणारी ५० वर्षीय महिला सईदा रिझवान सय्यद, रा. हनुमान नगर, मधली वाडी, संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी हिला एका अज्ञात इसमाने मारहाण व तिच्या डोक्याला गंभीर इजा करून तिला जीवे मारले होते. शोधाशोध सुरू असताना जंगलामध्ये काही अंतेरावर मच्छीची टोपली व तिथेच काही अंतरावर तिचा मृतदेह मिळाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी या तरुणाने मृतदेह जंगलात फेकला होता. प्रथम दर्शनी पोलिसांना हा खून असल्याचा संशय आला होता त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मासे विक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलेचा खून होताच संगमेश्वर व परिसरामध्ये तसेच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत होती. या सगळ्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या गुन्ह्याच्या तपासाची सूत्रे हलण्याकरिता तातडीने घटनास्थळी भेट दिली होती. या परिसराची पाहणी करताना हा भाग अत्यंत दुर्गाव व जंगलमय असल्याने याच परिसरातील हा खून करणारा व्यक्ती असावा याचा अंदाज जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आला होता. यावेळी त्यांनी तातडीने या तपासाकरता पोलिसांचा पथक नियुक्त केलं संगमेश्वर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांचे संयुक्त पथक तयार करण्याचे निर्देश दिले त्याप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक उदय झावरे, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, व स्थानिक गुन्हा अन्वेषण रत्नागिरी व संयुक्त पथकाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. काही दिवसांच्या आतच म्हणजे दिनांक दि. २१ फेब्रुवारी रोजी गुप्त माहितीच्या आधारे पिरंदवणे बौद्धवाडी येथे राहणाऱ्या २३ वर्षीय संशयित युवकास जयेश रमेश गमरे यास ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई आज हेमंतकुमार शहर पोलीस निरीक्षक, उदय झावरे, पोलीस निरीक्षक संगमेश्वर पोलीस ठाणे व पोलीस अंमलदार यांनी केली आहे. या खुला प्रकरणी संशयित जयेश गमरे याला न्यायालयाने २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
जयेश रमेश गमरे या नराधम तरुणावर अनेक गुन्हे यापूर्वी दाखल झाले आहेत. महिलांची छेडछेडा करणे,चोरीचा गुन्हा आदी स्वरूपाचे गुन्हे याच्यावरती दाखल आहेत. हा खून केल्यानंतरही त्याच्यावरती एका महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. खून झालेली ही महिला दररोज सकाळी रत्नागिरीतून बहिणीकडे येते. तेथे फ्रेश झाल्यानंतर ती पुन्हा मच्छी विक्रीसाठी बाहेर पडते असा हा तिचा दिनक्रम होता. मच्छी विक्री करून ती आपल्या कुटुंबाला हातभार लावत असे. सईदा हिचे घर रत्नागिरी मध्ये असून हे कुटूंब रत्नागिरी येथे भाड्याच्या खोलीत राहते. तिच्या पश्चात पती, मुले असा परिवार आहे. पतीची रिक्षा आहे. हे कुटुंब मूळचे डिंगणी परिसरातीलच आहे. मात्र व्यवसायानिमित्त ते सध्या रत्नागिरी येथे स्थायिक आहेत. बुधवार दि. १५ फेब्रुवारी रोजी त्या घरातून सकाळी मच्छि विक्रीसाठी बाहेर पडली मात्र दुपारपर्यंत घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. शोधाशोध करत असताना डिंगणी करजुवे रोडवर त्यांची माशांची टोपली पडलेली दिसली. तिचा आजूबाजूला शोध घेतला असता रस्त्याच्या बाहेर जंगलात तिचा मृतदेह आढळून आला. जवळपास ३०- ४० फुटांवर फरफटत नेवुन हा मृतदेह निर्जंस्थळी टाकण्यात आला होता. तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा होत्या. या खुणाने अवघा संगमेश्वर तालुका हादरला होता. अवघ्या सात दिवसात या खुनाचा यशस्वी तपास करण्यात आल्याने रत्नागिरी जिल्हा पोलिसांच कौतुक करण्यात येत आहे.




0 टिप्पण्या